top of page

देवांचा आठवडे बाजार

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "पिलखोड" येथे वास्तव्याला असलेले "देव व शिरोडे" समाजबांधव आपल्या पुढच्या पिढीला व्यवसाय शिक्षण देताना आपल्या चिरंजीवांना व्यवसाय करण्यासाठी "पिलखोड" जवळील एखादे पायी चालत(मांदुरणे,सायगाव,अलवाडी,टाकळी इ.)

किंवा बैलगाडीने जाण्यासारखे खेडे(उदाहरणार्थ - भोरस, मेहुणबारे, उंबरखेड, वाघळी,पातोंडा,हिरापूर,सायगाव,खेडगाव,बहाळ,जामदा,पेठचे तरवाडे इ.) शोधून देत असत.

आपल्याजवळचे थोडेसे धान्य त्याला देत.

ते धान्य चिरंजीव त्या खेड्यातील लोकांना पेरणीच्या हंगामात कधी विनातारण,तर कधी अतिशय फुटकळ तारणावर, तर कधी येऊ घातलेल्या पिकाच्या भरोशावर,अतिशय चढ्या व्याजदराने(दिढीने) किंवा धान्याला दीड पटीने धान्य(मनोती) या बोलीवर उधारीवर देत.

पेरणी व कापणी या मधल्या काळात चिरंजीव या धान्याची किरकोळीने विक्रीही करत.

धान्याबरोबरच तेल,तूप,मसाले,साखर,गूळ,पीठ,डाळी अशा रोजच्या संसाराला आवश्यक अशा गोष्टींची किरकोळ विक्री करत.

यातून मिळणाऱ्या नफ्यावर मोठ्या व्यापाराची सुरवात होत असे.

माझे आजोबा श्री.महादेव गणपत वाणी(देव) याच प्रकारे तुपाचा व्यापार करीत "पिलखोड" हून "भडगाव" ला स्थलांतरित झाले व आम्ही "पिलखोडकरां" चे

"भडगावकर" झालो.

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page