देवांचे देव
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan)
काय आहे मध्य आशियातील "टोचेरीयन(Tocheriyan)" या भाषेमधील "देव(Dyeus)" ही "सर्वसमावेषक" संकल्पना ?
प्राचीन अप्रगत मानवाला आपल्या डोक्यावरील छप्पराचा म्हणजे "नभाचा" मोठाच आधार वाटत असला पाहिजे. दिवसा सूर्यप्रकाशात लख्ख उजळून निघणारे हे आभाळ त्याला प्रकाश देत होते. मार्ग दाखवत होते. त्यामुळे त्याला त्याचे अन्न शोधता येत होते. त्यामुळे त्याने प्रकाशाला "देव" मानले. या प्रकाश देणाऱ्या "नभाला" त्याने पोषणकर्ता म्हणून "पितृ" स्थान दिले.या उलट अंधाराला("तम") "अन्न हिरावणारा" म्हणून "राक्षस" मानले.
हळू हळू आदिमानवाच्या हे लक्षात येऊ लागले की प्रकाशाच्या बरोबरीने निसर्गामधील अन्य गोष्टीसुद्धा अन्नाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत. त्या सर्वांना त्याने देवत्वाचा अंश मानले. वेदांमधील सर्वात प्राचीन असा "ऋग्वेद" सुद्धा तेहेतीस नैसर्गिक घटनांना "देव" मानतो.
"ऋग्वेदा" नंतर लिहिल्या गेलेल्या "ऐतरेय ब्राह्मण" या ग्रंथामध्ये या "देवांची" क्रमवारी लावलेली सापडते. विश्वदेव(सर्व देव एकत्रित),वरूण(देव व दानव दोन्ही रुपात),सावित्र,विष्णू,रुद्र हे तीन उपदेव, विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव, देवाची स्त्री रूपे म्हणजे देवी(उषा,पृथ्वी सरस्वती), "बृहद अरण्यक" उपनिषदांमध्ये अष्टवसू, अकरा रुद्र,बारा आदित्य, इंद्र असे तेहेतीस कोटी "देव" वर्णिले आहेत.
"पुराणां" मध्ये ब्रह्मदेवाच्या पुत्रांची (मारिची,अत्री,अंगिरा,पुलत्स्य, पुलहक्रतु,वसिष्ठ,दक्ष व नारद) माहिती दिली असून मरिचीच्या "कश्यप" नावाच्या पुत्राला तेरा बायका (आदिती, दिति, दानू, कद्रू इ.)असल्याचे सांगितले आहे.या पैकी आदितीचे पुत्र आदित्य,दितीचे पुत्र दैत्य तर दानूचे पुत्र दानव !
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) बांधव "ब्रह्मदेव" पुत्र "मरिची" याचा पुत्र "कश्यप" याला आपला "आदिपुरुष" मानतात.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments