देवांचे व्यापार कौशल्य
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
खेडो-पाडी फिरून,दिवसभर राबून,येताना-जातानाचा प्रवासाचा शीण सोसून,मिळेल ते खाऊन,न मिळाल्यास उपाशी राहून लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देवां" नी दोन पैसे गाठीला बांधले.
नवा दिवस उजाडला की नवे गाव, नवी खरेदी - नवी विक्री - नवा नफा !
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देवां" च्या अशा "व्यापारी" कर्तृत्वाने महिन्याभरात त्यांचे भांडवल "आठ पट" वाढत असे. त्यामुळे अन्य समाज त्यांना उपहासाने "लोटा घेवून आले आणी हंडा घेऊन निघाले" किंवा "आम्हाला लुटून पै चे लाख केले" असे म्हणत असत.
अशा या कार्यपद्धतीमधून मूळचे "पिलखोड" चे असलेले "देव" हळू हळू जळगाव जिल्ह्यामधील, चाळीसगाव परिसरात, विशेषतः मालेगाव – चाळीसगाव रस्त्यावरील हरेश्वर पिंपळगाव,टाकळी,पोहरे,वणगाव या त्यावेळी लहान असलेल्या गावांमध्ये पसरले.
याच कार्यपद्धतीमधून काही देव भोरस, मेहुणबारे, उंबरखेड, वाघळी, पातोंडा, हिरापूर, सायगाव, खेडगाव, बहाळ, जामदा इ.गावांमध्येही पसरले असतील.
त्या सर्वांची माहिती संकलित झाल्यास या “देवांच्या शोधाला” "देवकुलवृतांता” चे स्वरूप देणे सहज शक्य आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments