देवशयनी एकादशी - थॅलेसेमिया प्रततिबंध
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
"वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाज व "शैव" पंथीय लिंगायत वाणी समाज यांना एकमेकांशी जोडणार्या "कार्तिकी एकादशीला "प्रबोधन" एकादशी या नावाने देखील ओळखले जाते.चार महिने निद्रितावस्थेत असलेले देव या दिवशी जागृतावस्थेत येतात असे श्रध्दाळू मानतात.त्यामुळेच कार्तिकी एकादशी "देवशयनी" या नावाने देखील ओळखली असते.
मनोभावे "कार्तिकी एकादशी" पाळणार्या किती लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना ही गोष्ट माहित आहे ?
त्याच प्रमाणे सुमारे ५% लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे "वाहक (Carriers)" आहेत ही गोष्ट तरी किती जणांना माहित आहे ?
अशा समाज बांधवांनी परस्परांशी विवाह करण्याचे टाळल्यास हा समाज सहजपणे "थॅलेसेमियामुक्त" समाज करता येईल ही गोष्ट तरी किती जणांना माहित आहे ?
त्यामुळे "देवशयनी" उर्फ "कार्तिकी" एकादशीच्या शुभमुहूर्तावर जसे देव जागे झाले तसेच आपण सारे जागृत होऊ या व "थॅलेसेमियामुक्त" समाज निर्माण करू या.
त्यासाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील समस्त समाज बांधवांची "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करावी लागेल.
त्यासाठी काय करावे लागेल ?
किमान विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी तरी ही तपासणी अवश्य करावी व दोन थॅलेसेमिया वाहकांनी परस्परांशी विवाह करणे नक्कीच टाळावे.
सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी ही वैज्ञानिक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे सामाजिक कार्य करणार्या सौ.रेखाताई मालपुरे, कल्याण यांनी भजन कीर्तनाच्या माध्यामातून सर्व भक्तांना "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करण्यास प्रवृत्त करण्याचा संकल्प केला आहे.त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
नाट्य व सिने क्षेत्र,राजकिय व सामाजिक क्षेत्र तसेच लाड सका(शाखीय) वाणी समाजातील असंख्य समाज बांधवांशी व्यापक जनसंपर्क असलेल्या सौ.रेखाताई मालपुरे, कल्याण यांना त्यांच्या या "थॅलेसेमियामुक्त लाड सका(शाखीय) वाणी समाज अभियान" या कार्यात परमेश्वर सुयश देवो.हीच "देवशयनी एकादशी" च्या शुभमुहूर्तावर विठ्ठल चरणी प्रार्थना !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०८९)




Comments