नाणेघाटातील नाणी
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सुप्रसिध्द गड-किल्ले अभ्यासक श्री.विजय विखराणकर यांनी नुकतीच लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या जुन्नर,पुणे येथील "नाणेघाट" या प्राचिन व्यापारी मार्गाला अकरावी भेट दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
इ.स.पूर्व दुसर्या शतकातील "नाणेघाट" या "सातवाहन" कालीन प्राचिन व्यापारी मार्गावरून नाशिक येथील लाड सका(शाखीय) वाणी समाजातील व्यापार्यांचा माल थेट कोकणात पोहोचत असे.याचे असंख्य पुरावे कान्हेरी, नाशिक तसेच "नाणेघाट" येथील लेण्यांमधे आढळून येतात.
या घाटात व्यापार्यांकडून "नाण्यां" च्या स्वरूपात "जकात" वसूल केली जात असे.त्यामुळे हा घाट "नाणेघाट" या नावाने ओळखला जातो.ही "नाणी" मोठ्या दगडी रांजणात साठवली जात असत.त्या रांजणाचा श्री.विजय विखराणकर यांनी पाठविलेला फोटो अवश्य पहा.
ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या पूजेत ही "प्राचिन नाणी" अजूनही असतील त्यांनी त्यांचे दोन्ही बाजूंनी फोटो काढून या अभ्यासगटात प्रसृत करावेत.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख).




Comments