पंजाबी ड्रेस
- dileepbw
- Sep 17, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाअधिवेशनच्या निमित्ताने प्रसृत करण्यात आलेली राजस्थान,गुजरात ते महाराष्ट्र या स्थलांतराची ध्वनीचित्रफीत पहाण्यात आली व ते राजस्थात कोठून आले याचा धांडोळा घेताना हाती लागलेली काही माहिती सर्वांच्या माहितीसाठी प्रसृत करीत आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे येथील भारतीय संस्कृतीच्या प्राध्यापिका डॉ.मंजिरी भालेराव यांनी लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" पूर्वजांच्या "ब्राह्मी" या लिपीचा अभ्यास करून ती "देवनागरी" लिपीची जननी असल्याचे म्हटले आहे.James Prinsep या ब्रिटिश तज्ञाने हा शोध लावलेला आहे.
डॉ.मंजिरी भालेराव यांच्या मते भारतातील "पंजाबी ड्रेस" ही लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" पूर्वजांची देणगी आहे.
डॉ.मंजिरी भालेराव यांनी "सका" लोकांचा व सुमेर लोकांचा व्यापारी संबंध यावरही प्रकाश टाकला आहे.सुमेर लोकांनी आपला इतिहास मातीच्या भाजलेल्या विटांवर लिहून ठेवल्यामुळे हे शक्य झाले आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)




Comments