top of page

पूर्वजांची माहिती

  • dileepbw
  • Sep 29, 2022
  • 2 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांची खालील माहिती N.S.Gill या लेखकाने लिहिलेल्या लेखात वाचायला मिळते :-

१.मध्य आशियातील इराणचे पठार व सिंधू नदीच्या खोर्‍यात रहाणारे,वैशिष्ट्यपूर्ण भटके व विमुक्त जीवन जगणारे, प्राचीन लोक.

२.पर्शियन लोक त्यांना "सका" म्हणून ओळखत असत.

३."सका/शक/Scythian" लोक उत्तम अश्वारोहक,अचूक धर्नुधर व

पशुंबद्दल विशेष प्रेम असलेले पशुपालक लोक होते.

४.डोक्यावर हिम(बर्फ) साठू नये म्हणून केसाळ प्राण्यांच्या कातडीपासून बनविलेली निमुळती टोपी,अंगात थंडी पासून संरक्षण करणारा बाराबंदीसारखा केसाळ प्राण्यांच्या कातडीपासून बनविलेला पायघोळ अंगरखा,अश्वारोहणासाठी उपयुक्त असलेली तंग तुमान,शस्त्रे अडकविण्यासाठी कंबरपट्टा,हिम(बर्फ) तुडवित चालता यावे यासाठी गुडघ्यापर्यंत पोहोचणारे उंच चामडी बूट असा "सका/शक/Scythian" लोकांचा वैशिष्ट्यपूर्ण पोशाख असे.

५.दुध,पनीर,कुमीस नावाचे मद्य,मांस,गती अशा अनेक गोष्टी पुरविणारा "अश्व" हा प्राणी "सका/शक/Scythian" लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.

६."सका/शक/Scythian" लोक विविध नावांनी ओळखले जात असत :-

Hippemolgi - घोडीचे दूध पिणारे

Sacae - धनुर्धर

Skudat - धनुर्धर

Getae - ग्रीक

Sakai - पर्शियन

Saka Haumavarga - सोमरस पिणारे

Saka Paradraya - पाणथळीत रहाणारे

Saka Tigrakhauda - निमुळत्या टोप्या घालणारे

Saka para Sugdam - सोग्डियाना या प्रांताच्या पलीकडे रहाणारे

Ashguzai/Ishguzai - Assyrians

Ashkenaz - Bible

Massagetae - शक्तिमान

Cimmerians - सुमेर

७.जगातला पहिला "सका/शक/Scythian" पुरूष - Targitaos(आकाशतत्व व जलतत्व या मूलभूत तत्वांपासून निर्माण झालेला दैवी पुरूष)

८.Targitaos च्या तीन सुपूत्रांपासून संपूर्ण "सका/शक/Scythian" लोकांची(Scoloti) निर्मिती झाली.

मोठा Leipoxais - Auchatae(शेतकरी)

मधला Arpoxais - Catiari(कामगार) व Traspians(कारागिर)

धाकटा Colaxais - Paralatae(सैनिक)

९.अफू(Hemp/Canabis/सोम) या मादक द्रव्याचे सेवन,नरबळी, शौर्य व क्रोर्य,शत्रूचे रक्तप्राशन अशा काही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा "सका/शक/Scythian" लोकांमधे होत्या.

ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी खालील संदर्भ अवश्य वाचावे.ही नम्र विनंती :-

1.The Scythians, by Jona Lendering.

2.The Scythian Domination in Western Asia: Its Record in History, Scripture, and Archaeology, by E. D. Phillips 3.World Archaeology. 1972.

4.The Scythian: His Rise and Fall, by James William 5.Johnson,Journal of the History of Ideas. 1959 University of Pennsylvania Press.

6.The Scythians: Invading Hordes from the Russian Steppes, by Edwin Yamauchi. 7.The Biblical Archaeologist. 1983.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page