पारशी संबंध
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल
पारशी धर्मग्रंथ "अवेस्ता” याच्या नंतर लिहिला गेलेला पारशी धर्मग्रंथ "वेन्दिदाद" हा जवळ जवळ संपूर्णपणे "देव" या संकल्पनेला "दानवां" च्या रांगेत नेऊन बसवणारा धर्मग्रंथ आहे.
या ग्रंथामध्ये वेदिक संस्कृतीमधील देवांचा राजा "इंद्र", देवाधिदेव महादेव "शिव" व "नसत्य" हे "अहूर" म्हणजे "असूर" म्हणून वर्णिले आहेत.
पारशी राजा "झेरेक्शस" (कृपया नाणे व पुतळा पहा) याने इ.स.पू.पाचव्या शतकात "देवां" चे पूजन करणाऱ्या "सका/शक/Scythian" वंशाच्या जनसमूहावर विजय मिळवला व त्याचवेळी त्याने जेता म्हणून जीतांचे "देव" मोडीत काढले व "अहुर मझदा" (कृपया पुतळा पहा) या जेत्याच्या देवाचे पूजन सर्वाना बंधनकारक केले.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments