पणी/पर्णी जमात
- dileepbw
- Sep 23, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी" या जमातीचा महाभारतकालीन इतिहास
हरिवंश, महाभारत व रामायण या भारतीय महाकाव्यांमध्ये ग्रीक(यवन = आयोनियन), शक(सायथियन = Scythians), पहलव(Pahlava = Parthians), बाल्हिक ((Bahlika = Bactrians) व कम्बोज(Kamboja= Caucasians) या हिंदूकुश पर्वतराजींच्या उत्तरेला राहणाऱ्या पाच लोकतंत्र प्रांतांचा "पंचगण" म्हणून उल्लेख केलेला आढळतो.(कृपया नकाशा पहा)
भारतामध्ये तेव्हा "राजेशाही" चालू होती. त्यामुळे या "लोकतांत्रिक म्हणजे प्रजासत्ताक" प्रांतांना तत्कालीन भारतीय राजे अप्रगत,रानटी टोळ्या (Barbaric Tribes) असे समजत असत.
वास्तविक तसे नव्हते.या पंचगणांची प्रत्येकाची स्वतःची प्रगत संस्कृती व दैदिप्यमान इतिहास होता. या पंचगणांपैकी शकांवर ग्रीकांच्या "हेलेनिक(Hellenic)" संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. एवढेच नव्हे तर शकांच्या राज्यकारभारात व समाजकारणात ग्रीकांचा मोठा सहभाग होता.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments