"पणी" म्हणजे "वाणी"
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाच्या,"पर्णी(Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोकांची वैशिष्ठ्ये
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाचे,"पर्णी (Parni)/पणी" म्हणजे "वाणी" लोक विशेषतः "लिंगायत वाणी" लोक भगवान शंकराला "विनाशातून निर्मिती" करणारा देव मानतात हे आपण या पूर्वी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका /शक /Scythian" वंशाचे, "पर्णी(Parni)/पणी" म्हणजे "वाणी" लोकांच्या "आद्य(हिंग्लाज माता,वैष्णोदेवी,माता,ज्वाला माता इ. -कृपया फोटो पहा) व कच्छ, राजस्थान,गुजरातमधील प्रतीकात्मक कुलदेवतांवर लिहिलेल्या लेखमालेमध्ये वाचलेलेच आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण होणाऱ्या "लाव्हा" रसापासून तयार होणारी सुपीक जमीन व त्या पाठोपाठ नद्यांच्या स्वरुपात बाहेर पडणारे भूगर्भातील पाणी या दोन्ही गोष्टी “अन्न” निर्मितीसाठी अत्यावश्यक आहेत. तर "अन्न" ही मानवी जीवनाची प्राथमिक व मुलभूत गरज आहे. त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या, "सका/शक/ Scythian" वंशाचे, "पर्णी (Parni)/पणी" म्हणजे "वाणी" लोक भगवान शंकराला "ज्वालामुखी(हिंग्लाज माता,वैष्णोदेवी माता, ज्वाला माता इ.) स्वरुपात" व पार्वतीला "अन्नपुर्णा/भूमाता(सोनेरी पीत वर्णाची झळाळी असलेल्या मक्याच्या कणसाच्या)” या स्वरुपात पूजतात. तर या दोघांच्या पुत्राला म्हणजे "गजानना" ला "सुबत्ते” च्या स्वरुपात पूजतात.
"सुपीक जमीन व पाणी" यांच्या बरोबरच शेतीसाठी आवश्यक असलेल्या "श्रम" या गोष्टीचे प्रतिक म्हणून "नंदी बैल" सुद्धा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाचे,"पर्णी(Parni)/पणी" म्हणजे "वाणी" लोकांना पूजनीय आहे.
त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाचे,"पर्णी (Parni)/ पणी" म्हणजे "वाणी" लोकांच्या विवाह समारंभात "गौरी-गणेश" पूजन हा महत्वाचा विधी समजला जातो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments