बंगालमधील देव कुल
- dileepbw
- Sep 13, 2022
- 2 min read
लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचा वृतांत
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांपैकी "देव" या राजघराण्याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे.
शके ११०० ते शके १३०० या काळात,"पुरुषोत्तम देव" (कृपया फोटो पहा) या अतिशय सामान्य (गावचा प्रमुख किंवा ग्रामणी) परिस्थितीतील व्यक्तीने त्यावेळच्या "सेन" घराण्याकडून वंग प्रांताची सत्ता हस्तगत केली.
ओरिसा प्रांतामधील हे नवे "देव" साम्राज्य हिंदू धर्मियातील "वैष्णव" पंथाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांपैकी "देव" या राजघराण्याचे होते.
शके ८०० ते शके ९०० या काळामध्ये सुध्दा "देव" घराण्याची वंग प्रांतावर सत्ता होती. पण ते होते बुद्ध धर्मीय ! त्यांची राजधानी होती "देवपर्वत" व राजा होता "समतात" !
त्यानंतर तेथे शांती देव,वीर देव,आनंद देव व भव देव असे चार “देव” राजे होऊन गेले. पण हे "देव" घराणे सुध्दा बुद्ध धर्मीय !
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" घराणे हे हिंदू धर्मियातील "वैष्णव" पंथीय घराणे ! "वंग" प्रांतामधील विक्रमपूर(सध्याच्या बांगलादेशमधील मुन्शिगंज जिल्हा) या ठिकाणी वैष्णव पंथीय "पुरुषोत्तम देव" (कृपया फोटो पहा) याने आपली राजधानी स्थापन केली.
त्याचा पुत्र "मधुसूदन देव" त्याच्यापेक्षा जास्त कर्तबगार निघाला.लोक त्याला "नृपती" मानू लागले.
"मधुसूदन देव" याचा पुत्र "वासु देव" व वासु देवाचा पुत्र "दामोदर देव" !
"दामोदर देव" याने शके १२३१ ते शके १२४३ असे १२ वर्षे अतिशय प्रभावीपणे राज्य केले.
"देव" राजघराण्याने "अरीराजा चाणूर माधव सकल भूपती" असे नामाभिधान धारण केल्याचे त्यांनी प्रसृत केलेल्या शके ११५६,शके ११५८ व शके ११६५ मधील "चितगाव" येथे सापडलेल्या ताम्रपटावरून दिसते.
सध्याच्या बंगाल प्रांतामधील कोमिल्ला,नौखाली व चितगाव परिसरामध्ये सुरु झालेले हे "देव" साम्राज्य "दशरथ देव" राजाच्या कारकीर्दीमध्ये अधिकच विस्तारत गेले.
पुढे शके १२८१ मध्ये "तारीख-ए-मुबारकशाही" या ऐतिहासिक ग्रंथामध्ये लेखक "याह्या बिन अहमद" याने "दशरथ देव" राजाने "घीआस-ऊद-दिन-बल्बन" याच्याशी संधी केल्याचे नमूद करून ठेवले आहे.
इ.स.१९१३ ते इ.स.१९७४ या काळात ओरिसा प्रांतातील "पार्लाखिमेडी" येथे कप्तान महाराजासाहेब श्री श्री श्री कृष्णचंद्र गजपतीनारायण देव यांची नामधारी सत्ता होती. (कृपया फोटो व पुतळा पहा)
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments