"बागलाणचे बाबा"
- dileepbw
- Sep 6, 2022
- 1 min read
जातीभेद नष्ट करण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून मूळचे नामपूरचे व आता नाशिकला स्थायिक झालेले,लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधव श्री.अशोक गंगाधर खुटाडे उर्फ वकील साहेब यांनी सांगितलेली लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील, सामाजिक व राजकीय नेतृत्व करणारे "बागलाणचे बाबा" श्री.नरहर गोपाळ अलई यांची एक संस्मरणीय आठवण येथे सांगत आहे.
दीपावलीच्या दिवशी,बाबांच्या नामपूर येथील वाड्यावर, त्या काळात, जाती निर्मूलनासाठी,सर्व समाजातील व्यक्तींच्या सहभोजनाचे आयोजन केले जात असे.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे काम करीत असताना, अन्य जातीच्या लोकांबरोबर सहभोजन केल्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातून बहिष्कृत केलेल्या,राष्ट्रीय विचारांच्या ध्येयवेड्या तरुणांना, "बागलाणचे बाबा" श्री.नरहर गोपाळ अलई यांनी पुन्हा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात सामावून घेतले, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.




Comments