भारतीय समाजातील स्थान
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांना त्यांचा पराक्रम(अग्निदिव्य) पाहून वैदिक ब्राह्मण लोकांनी त्यांना दक्षिणेच्या बदल्यात "अग्निकुल, सूर्यकुल,चंद्रकुल,रघूकुल" इत्यादी नावांनी वैदिक धर्मात सामावून घेतले असे मत श्री.मोहन गुरूस्वामी या अभ्यासकाने मांडले आहे.त्यांच्या मते मुख्यत: वायव्य भारतातून व काही प्रमाणात ईशान्य भारतातून आलेल्या अनेक स्थलांतरीत लोकांच्या अनेक संस्कृतींच्या मिश्रणातून सध्याची भारतीय संस्कृती तयार झालेली आहे.राजस्थानी(सिसोदिया,जाट,अहिर,गुजर,ठाकूर)लोकांचे मूळ "सका/शक/Scythian" लोकात (सासानियन,गेटी,आवार,
खजार,तुखारियन) आढळते ते यामुळेच.त्यांच्यामते वायव्य भारतातील "बोलन" खिंडीतून राजस्थानी(पवार,चौहान,राठी,सियाल इ.) तर "खैबर" खिंडीतून पंजाबी(मान,गिल,बाजवा,भुल्लर,संधू इ.) लोक भारतात आले.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)
Comments