भडभुंजा वाणी समाज
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "भडभुंजा" वाणी समाज
उत्तर प्रदेशात सुमारे ३०० उपगटात(उदा.अयोध्यावासी, श्रीवास्तव, माथूर, सक्सेना, हमीरपुरिया, कनोजिया इ. ) विभागला गेलेला, खंडी बोली, भोजपुरी तसेच हिंदी बोलणारा "भडभुंजा" वाणी समाज हा मुळचा "कायस्थ" समाजाचा घटक !
"हरभरा" भाजून त्याच्या "डाळ/डाळ्या" याचा व्यापार करू लागल्यामुळे तो "भडभुंजा" वाणी समाज म्हणून ओळखला जाऊ लागला व "पंच पीर" तसेच "बरम बाबा" यांच्या पुजनाकडे वळाला.(कृपया फोटो पहा)
पंजाबमध्ये "मेहरा" म्हणून ओळखला जाणारा हा पंजाबी भाषिक "भडभुंजा" वाणी समाज बहल,समला,देह, शिहोत्रा,मेहरोत्रा अशा गोत्रांमध्ये विभागला गेला आहे.
महाराष्ट्रात परमार,पवार,परोतीया,जाधव, शिंदे, चौहान अशी कुलनामे धारण करणारा "भडभुंजा" वाणी समाज देखील अन्य वाणी समाजाप्रमाणे "समान" कुलनामाच्या व्यक्तींमध्ये विवाह संबंध प्रस्थापित करीत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments