"भारतीय रागदारी - भाग - ११"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - ११"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते !
अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी एका विशिष्ट "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे घेऊ या. कशाची आठवण होते हे गाणे ऐकून ? शंकर एहसान लाॅय या संगीतकारांनी ते "दिगंबरा हो दिगंबरा" या दत्ताच्या लोकप्रिय आरतीच्या चालीवर बांधलेले हे गाणे आहे.दोन्ही गाण्यांचा "राग" एकच ! कोणता ? भारतीय "रागदारी" मधे काय वैशिष्ट्य असते संगीतकारांचे ? वाचा.
प्रत्येक संगीतकाराची आपली अशी एक "शैली" असते.वेगळा विचार करण्याची पद्धत ही राजा वखारीया व निक्या मेहता अचूकपणे टिपत असत. ही फार "सूक्ष्म" गोष्ट आहे.त्याचे थोडेफार ज्ञान या दोघांनी मला दिले.त्यांचा मी आभारी आहे.
संगीतकाराने जे म्हटलंय ते तर आपल्याला गायचं आहेच,शिवाय आपल्याला काय समजलंय तेही गाताना व्यक्त व्हायला हवं अशी गायकाची "तारेवरची कसरत" असते.भैरवी हा राग "आर्त" मानला जातो.ही "आर्तता" गायकाला गाण्यात दाखवावीच लागते.प्रत्येक "रागा" मधील भावनांच्या "सूक्ष्म छटा" जर गायकाला कळल्या नाहीत तर गाणे कधीच रंगत नाही.एकदा या छटा जाणवल्या की मग ते तुमच्या गाण्यातून व्यक्त झाल्याच पाहिजेत.




Comments