"भारतीय रागदारी - भाग - १३"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - १३"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" नी सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते ! भारतीय रागदारीमधे काय वैशिष्ट्य असते संगीतकारांचे ? वाचा.
"तालाचं अंग" भावसंगीतात कसं येऊ शकतं याचे उदाहरण म्हणजे अंजली मंगरूळकरने सांगीतलेले "कजरारे कजरारे" व दिगंबरा हो दिगंबरा" हे गाणे !
"जोडरागा" त हे अनेकवेळा जाणवतं.त्यात एक स्वर असा असतो जो दोन रागांसाठी "सांधा" असतो.ज्याच्या आधारे अन्य स्वर आपलं बदललेलं रूप दाखवतात.
"स्वरांचा सुसंवाद" म्हणजे काय ते चांगल्या संगीतकारांच्या रचनांतून लगेच कळतं.प्रत्येकाची संगीतविषयक विचार करण्याची पद्धत वेगळी असते.परंपरेचा एक वेगळा अर्थ काढण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.




Comments