top of page

"भारतीय रागदारी - भाग - १७"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 1 min read

"भारतीय रागदारी - भाग - १७"

©दिलीप वाणी,पुणे

अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी "भैरव" या "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे अभ्यासासाठी घेऊ या.

१."भैरव" हा भारतीय शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या वेळी आळवला जाणारा आणि मैफलीची सांगता करणारा एक राग आहे.

२.ह्यांत षड्ज,कोमल ऋषभ,तीव्र गांधार,कोमल मध्यम,पंचम,कोमल धैवत,तीव्र निषाद हे स्वर लागतात.

३.जाति-संपूर्ण,वादी धैवत,संवादी ऋषभ,गायन समय प्रातःकाल.

४.ह्याच्या अवरोहांत कोमल निषादाचा अल्प प्रयोग "विवादी" ह्या नात्यानें केलेला दिसतो.

५.ह्याचे अहीर,आनंद,गुणकली,प्रभात,बंगालशिव, रामकली,सौराष्ट्र,हिजेज इ. प्रकार आहेत.

६.अन्य नावे - अहीरभैरव,कैरव,चिद्भैरव,टोलभैरव, टोळभैरव,पैरव,बगालभैरव

७.अगर शिवभैरव - बस भैरव व तोडी या दोन रागांच्या मिश्रणाने हा राग तयार झाला आहे. शिवाय,भैरवी व आसावरी रागाचे अंगही यात समाविष्ट अहे.

८."भैरवी" ही आश्रय ‘रागिणी’ मानण्यात येते व हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात ही नेहमी शेवटी सादर करण्याचा प्रघात दृढमूल झालेला दिसतो.

९.या थाटात भैरवी,सिंधभैरवी,मालकंस,चंद्रकंस, बिलासखानी तोडी,मोरवी,भूपाल तोडी,उत्तरी गुणकली,वसंत मुखारी यांचा मुख्यतः समावेश होतो.भैरवी रागात धृपदरचना विपुल तद्वतच ठुमऱ्या इ. सुगम रचनाही आढळतात.यावरून भैरवीची समावेशकता ध्यानात येते.

१०.आजकल इस राग में बारहों स्वर प्रयोग किये जाने लगे हैं, भले ही इसके मूल रूप में शुद्ध रे, ग, ध, नि लगाना निषेध माना गया है। इससे मिलता जुलता राग है - बिलासखानी तोड़ी।

आरोह- सा रे॒ ग॒ म प ध॒ नि॒ सां।

अवरोह- सां नि॒ ध॒ प म ग॒ रे॒ सा।

पकड़- म, ग॒ रे॒ ग॒, सा रे॒ सा, ध़॒ नि़॒ सा।

(= मन्द्र स्वर)


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page