"भारतीय रागदारी - भाग - २१"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - २१"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! टोपीचे शंकानिरसन करण्यासाठी आज स्त्रिलिंगी नाव धारण करणार्या "कलावती" या "रागा" ला "रागिणी" असे म्हणायचे का ? याचा अभ्यास केला. सांगतो.गझल गायक "जगजीतसिंग" ला "सिंग" ऐवजी "कौर" हा प्रत्यय लावला तर त्याची "चित्रा सिंग" होईल का ? विचार करून सांगा.
सुरांच्या "सा,रे,ग,न,प,द,नि,सा" या सप्तकामधील काही सुरांचा गट फ्रिक्वेन्सीनुसार आवाज खालून वर जाताना वापरणे आणि तसाच वरून खाली येताना विशिष्ट पद्धतीने वापरणे जेणे करून "कर्णमधुरते" बरोबरच ठराविक काळानुसार "रस-निष्पत्ती" करण्यास सहाय्यक होणाऱ्या सुरावटीचा विलोभनीय आविष्कार निर्माण करणाऱ्या रचनांना शास्त्रीय संगीत 'राग' असे म्हणते.
वर जाणाऱ्या सुरवातीला "आरोह" तर वरून खाली येणाऱ्या सुरवातीला "अवरोह" असे मूळ संस्कृत शब्द आहेत.विविध रागांमध्ये काही सूर पूर्णपणे वगळले जाऊ शकतात व त्यामुळे त्यांचा मनावर होणारा परिणाम बदलतो असे असंख्य लोक अनुभवतात. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा "२२ श्रुती(फ्रिक्वेन्सीज)" चा या कामी उपयोग करते. परंतु जागतिक स्तरावर मात्र एका ऑक्टेव्ह मध्ये १२ फ्रिक्वेन्सीवर सर्व भिस्त ठेवली जाते.भारतीय संगीतात १५ राग(यमन,मालकंस,भीमपलास, भैरवी,भैरव,बागेश्री,भूप,मियाँ मल्हार,देस,काफी, बिहाग,खमाज,तोडी,हंसध्वनी) जास्तीत जास्त ऐकायला मिळतात."फिल्मी संगीता" त रागांची निवड अशीच आहे, फक्त काही राग शास्त्रीय गायक निवडत नाहीत, पण बॉलिवूडमध्ये (मुखतः जुनी गाणी) मात्र संगीतकारांनी मुक्तपणे त्या रागांचा वापर केलेला आढळून येतो. या प्रकारचा एक राग म्हणजे "शिवरंजनी" ! हा राग ख्यालगायक फारसे निवडत नाहीत, पण अनेक हिंदी गाणी या रागात आहेत.फिल्मी गाण्यांमध्ये सर्वसाधारणपणे पहाडी ,शिवरंजनी,भैरवी,भूप, पिलू,भीमपलास,बागेश्री,यमन,दरबारी कानडा, अहिर भैरव इ.राग निवडण्यात येतात.
तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे "जो राग कानाला चांगला वाटतो तो आवडता" असे मी समजतो.तो का आवडतो याचा वैद्यकीय अभ्यास आता सुरू केला आहे.त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या
केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे.




Comments