"भारतीय रागदारी - भाग - २२"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - २२"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे "जो राग कानाला चांगला वाटतो तो आवडता" असे मी समजतो.तो का आवडतो याचा वैद्यकीय अभ्यास आता सुरू केला आहे.त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे.त्यातून काय गवसले ? ऐका.
"देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा" हे "आम्ही जातो आमुच्या गावा" या मराठी चित्रपटामधील सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले गीत राग 'भूप' वर आधारित आहे व हा राग सकाळच्या वेळी म्हाणजे "पूजा समयी" च ऐकायला मला तरी उत्तम वाटतो."भूपाळी" या शब्दावरूनच तर "भूप" हा शब्द आलेला आहे.प्रत्येक रागाची नावे कशी आली हे कळाले तर त्या रागाचा आस्वाद अधिक चांगला घेता येतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्हाला काय वाटते ? त्यातून माझी काही "समीकरणे" मी तयार केली आहेत.वाचा.
पं.मल्लिकार्जुन मन्सूर = मियां की तोंडी.
पं. द. वि. पलुस्कर = छोटा बिभास.
गानसरस्वती किशोरीताईं = मालकंस
पंडित उल्हास कशाळकर = भैरव
विदुषी प्रभा अत्रे = कलावती
तुमची पण अशीच काही "समीकरणे" ठरली असतीलच ना ?




Comments