"भारतीय रागदारी - भाग - २९"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग - २९"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्याप्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या
केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ते ऐका.
आरतीने सुचवलेली "Bhatkhande Notation System" वाचली.ती वाचून हा लेख लिहिताना मला माझी तुर्कस्तानची रक्तपेढीविज्ञान परिषद आठवली.तेथे मी एका सेशनचा अध्यक्ष होतो. सेशन संपल्यावर मला अध्यक्षीय समारोप करायचा होता.माझे गुरूवर्य डाॅ.भीमसेन रायचूर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रोत्यांशी भावनिक जवळीक साधण्यासाठी मला माझ्या अध्यक्षीय भाषणाची सुरूवात "तुर्की" भाषेत करायची "हौस" होती.मग मी थोडीशी "भातखंडेगिरी" केली.पहिले वाक्य (Stitch in time saves nine) इंग्रजीत लिहून एका "तुर्की" व्यक्तीकडून त्याचे "तुर्की" भाषेत भाषांतर करून घेतले व ते "रोमन" लिपीत लिहून घेतले.ही परिषद आंतरराष्ट्रीय असल्याने तेथे आपोआप भाषांतर करण्याची "यंत्रणा" बसवलेली होती.त्यामुळे माझ्या इंग्रजी भाषणात मधेच हे "तुर्की" वाक्य आल्याने ती "यंत्रणा" एकदम गडबडूनच गेली. त्यामुळे ज्यांना "Bhatkhande Notation System" समजणार नाही त्यांनी खुशाल गाण्यांचा आनंद लुटावा. आमलेट आवडायला स्वत: अंडे घालायची अजिबात आवश्यकता नाही.
"Romanized Transcription of Lyrics"
1.The traditional system of notation uses the Devanagari (Hindi) script, but it is easier to romanize for digitization. 2.The words to the composition are written out under the title line in a way that makes them easy to understand for those who know the language.
3.However, for notation purposes, Bhatkhande uses a transcription code designed to help even those who do not know the language achieve a relatively natural pronunciation.
4.The code is mostly intuitive, but here is a brief explanation of some of the characters:
aa = open "a" sound (as in "car" and "bar")
a = closed "a" sound (as in "funny" and "run") or a schwa sound (as in "about" or "another")
i = "i" sound (as in "bit")
u = "u" sound (as in "put")
e = used for both the æ sound (as in "bat" and "cat") and an elongated "e" sound (somewhere between "bet" and "bait")
o = two kinds of "o" sounds (as in "horse" as well as "show")
d = a soft "d" sound
D = a hard "d" sound
dh = an aspirated "d"
Dh = an aspirated "D"
t = a soft "t" sound
T = a hard "t" sound
th = an aspirated "t"
Th = an aspirated "T"
ज्यांना ही "कटकट" वाटते त्यांनी खुशाल गाणी ऐकावी.त्यासाठी नोटेशन येण्याची काहीही गरज नाही.




Comments