"भारतीय रागदारी - भाग ३"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग ३"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.काही चुकले-माकले तर जयंता, दीप्या,राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.
आसावरी,कल्याण,काफी,खमाज,तोडी,बिलावल,भैरवी,मारवा,रागमालिका,सरगम,सुगम शास्त्रीय संगीत,स्वरसप्तक या रागांच्या नावांशी व त्यातील रागविचार(राग अभिव्यक्ती), रागनिर्मिती,राग लक्षण,स्वरजति इ.व्याख्या समजावून घेतल्याखेरीज "भारतीय रागदारी" समजणार नाही.
आता ज्या "पहाडी" रागामुळे मी बालपणी संगीताचा धसला घेतला त्या रागातील काही गीते
सादर करतो.
१.असा मी काय गुन्हा केला (मराठी भावगीत, संगीत - वसंत प्रभू, गायिका - आशा भोसले)
२.केशवा माधवा (गायिका - लता मंगेशकर
३.फुलले रे क्षण माझे फुलले रे (मराठी भावगीत, कवी - नितीन आखवे, गायिका - आशा भोसले, संगीतकार - श्रीधर फडके)
४.मला लागली कुणाची उचकी (मराठी चित्रपट - पिंजरा)
५.माजे रानी माजे मोगा (कोकणी चित्रपटगीत, गीतकार : शांता शेळके; गायक : लता - सुरेश वाडकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : महानंदा)
६.लाजून हसणे अन् हासून ते पहाणे (मराठी भावगीत, गीतकार : मंगेश पाडगांवकर; गायक : पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे)
अशी सुमधूर गाणी ऐकल्यानंतर त्यांच्या रागाचे नाव "पहाडी" आहे हे ऐकून मला "राग" आला त्याचे काय नवल ?




Comments