top of page

"भारतीय रागदारी - भाग ७"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"भारतीय रागदारी - भाग ७"

©दिलीप वाणी,पुणे

"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्या" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे. उदयने "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.रोज कोण कुणाची मारते रे ? आज एक दिवस सहन कर की ! झेल मुकाट्याने !

"संगीत : विद्या की कला?"

लोकप्रिय संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ यातील कविराज ‘बांके बिहारी’ या पात्राच्या तोंडी लेखकानं मोठी मार्मिक विधानं घातली आहेत. तो म्हणतो, ‘बाहेरून आत येते ती विद्या आणि आतून बाहेर येते ती कला.’ ताल शिकवता येतो, पण लय वरून येतानाच घेऊन यावी लागते, ती शिकवता येत नाही. मला वाटतं विद्या आणि कला यांतील हाच फरक लक्षात घेतला पाहिजे

"बंदीश : तालबद्ध रचना"

आम्हांला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही, असं म्हणणाऱ्या रसिकांना, संगीतातील निरनिराळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. अशा विषयांची रसिकांना अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्याचं काम मी आज दिवसभरात करणार आहे.गायक कलाकार एखाद्या रागातून आपल्या बुद्धिकौशल्यानं श्रोत्यांसमोर सौंदर्यपूर्ण "स्वरमहाल" उभा करतात.उदय रोज असे "स्वरमहाल" आपल्यासमोर उभे करतो.किती जण त्याचे मन लावून परीक्षण करतात ?

"राग"

भारतीय संगीताचं एक वेगळं वैशिष्ट्यआपल्यापैकी बऱ्याच रसिकांना यमन, भूप, मालकंस, दरबारी कानडा, तोडी, ललित, पूरिया धनाश्री, भैरवी अशी काही रागांची नावं माहिती असतात. अमुक एक गाणं अमुक एका रागावर आधारित आहे असंही ऐकलेलं असतं, पण बहुतेकांना उत्सुकता असते ती राग म्हणजे काय याबद्दल. हे गाणं या रागातलं आहे म्हणजे काय, याची...आज पाहू या ‘राग’ या संकल्पनेबद्दल ! तो पर्यंत "झिझोटी(ध स रे म ग,स रे नि(कोमल) ध प स)" या रागातील काही गाणी ऐका.

१.बदली बदली दुनिया है मेरी...

२. कोई हम दम न रहा...

३. घुन्गरू की तरह बजता ही रहा हू मै...

४. एक चतुर नार...

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page