"भारतीय रागदारी - भाग - ८"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग - ८"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्या" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे. उदयने "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.रोज कोण कुणाची मारते रे ? आज एक दिवस सहन कर की ! झेल मुकाट्याने !
"बंदीश सजवणारे अलंकार"
भारतीय संगीतातलं "ख्यालगायन" आणि "बंदीश" यांची तोंडओळख आपण आधीच्या काही लेखांमधून करून घेतली. "रागा" चे मूळ नियम कायम ठेवून, प्रत्येक वेळी कलाकार आपल्या बुद्धिकौशल्यानं ख्याल नटवतात. रागातील ख्याल सादर करताना, प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा एक विचार त्यामागे असतो.बंदीश फुलवणाऱ्या या गोष्टींना "अलंकार" असे म्हणतात.काही उदाहरणे पहा.
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...
६.ख्वाजा मेरे ख्वाजा... राग व्रुन्दावनी सारन्ग .. ( काही इतर स्वर आहेत. पण ' बेकसो की तकदीर तूने है सवारी' ही ओळ मात्र वृन्दावनीचे स्वर दाखवते.)
७. तुमको पाया है तो जैसे खोया हु... पिलू
८.इन लम्हो के दामन मे पाकिजा से रिश्ते है....... मांड ( विशेषत्: दुसरा अन्तरा.. समय ने ये क्या किया बदल दी है काया...)
९.आँखो मे तेरी अजब सी अजबी अदाए है............. पहाडी.
कुठल्याही रागामधे जे स्वर येतात त्या स्वररचनेमुळे तो राग काही विशिष्ट वेळी गायला गेला तर प्रभावी ठरतो.परिणामकारक होतो.उदा: राग भीमपलास,दुपारी गावा.
तबला हे फक्त तालवाद्य आहे.एकतर ते साथीसाठी वापरतात नाहीतर "एकल(सोलो)" वादनासाठी !
राग कोणताही असला तरी ज्या तालात ती बंदिश बांधलेली आहे तो ताल तबल्यावर वाजवला जातो. तालवाद्ये - तबला डग्गा, मृदुंग, पखवाज वगैरे.
सर्वसाधारणपणे 'पूर्वी' राग दुपारी १२ ते मध्यरात्री १२ पर्यंत गातात. 'उत्तर' राग मध्यरात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत. या रागांतील वादी स्वर तो राग कधी गायचा, हे आपल्याला सांगतो.
अगदी सकाळी, सूर्योदयापूर्वी, किंवा सूर्यास्ताच्या वेळी - 'रे', 'ध' हे वादी स्वर. उदा: मारवा, पूर्वी.
मध्यान्ही, मध्यरात्री -'ग', 'नी' (कोमल)
उदा: सारंग, मालकंस, अडाणा
दिवसा व रात्री पहिल्या प्रहरी -'रे', 'ग', 'ध','नी'
उदा: रामकली, यमन
दुपारी व उत्तररात्री - 'सा', 'म', 'प'
उदा: मुल्तानी, सोहिनी.
एखाद्या रागातून व्यक्त होणारा भाव व आपली मनस्थिती यांची सांगड घालणं, एवढाच यामागील उद्देश ! कर्नाटक संगीतात वेळेचं हे बंधन नाही. मात्र कर्नाटक संगीतातून हिंदुस्थानी संगीतात आलेले राग, उदा: हंसध्वनी, विशिष्ट वेळीच गायले जातात.




Comments