top of page

मातृभाषा अहिराणीचे उदाहरण

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील तरूण पिढीला आपली "अहिराणी" ही मातृभाषा माहित व्हावी या उद्देशाने एक नमुना सादर करतो.

लाडसका वाणी लोकनी अहिराणीना खान्देशनी महाराजा सयाजीराव गायकवाड यासन संबंद काय?

१.महाराजा सयाजीराव गायकवाड यासना जलम दक्षिण खान्देशमा म्हणजे कौळांना ता. मालेगाव जि.नाशिक या अहिराणी पट्टामा व्हयल से. त्यासन मूळ नाव गोपाळ. बडोदाना राणीनी त्यासले दत्तक लेवावर त्यासन नाव बदलीसन सयाजी ठेव.

२.सयाजी महाराज १२ वरीसना व्हयनात तवलोंग त्यासनी कौळांनामा गावड्या चाऱ्यात. तठे त्यासले अहिराणी शिवाय दुसरी भाषा येय नही. त्यासना जिवलग दोस्तार चिंधा भिल संगे त्या भिलाऊ भाषा बी बोलेत. दुष्काय पडना कधी ते महाराज अंगावर लिमना डकसा भांदी गावभर धोंड्या धोंड्या पानी दे करत फिरेत. बडोदामा जाववर त्या मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकनात. सयाजी महाराज या शेवटला अहिर राजा व्हतात. त्यासनी जलमदेती माय उमाबाई नी बाप काशी बाबा यासले मरस्तवलोंग अहिराणी शिवाय दुसरी भाषा उनी नही. त्यासना संगे महाराज कायम अहिराणी भाषा बोलेत.

३.भारतना खूप मोठा दानी राजा सयाजीराव महाराज व्हतात. त्यासनी डॉ बाबासाहेब आंबेडकर संमत १४ भारतरत्न घडावात. म.फुले सावित्रीबाई फुले यासले मदत करी. बनारस हिंदु विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था अशा गनज संस्थासले गच्ची आर्थ साहाय्य कर. अस्पृश्यता निवारण, शिक्षण, शेती, बँका, रोजगार, पाणी पुरवठा कला, भाषा, साहित्य, नाटक या क्षेत्रमा खूप काम कर.

४.महाराजाना दोस्तार चिंधा भिल त्यासले भेटाले बडोदाना दरबारमा ग्या तवय महाराजनी चिंधा भिलले भर राजदरबारमा बठा दरबारी लोकेसना समुर अहिराणी गाणं म्हणाले लाव. दिवाइले गाय बारसले कान्हदेशमा ते गाणं आज बी म्हणतस

गाय भिंगरी गाय भिवरी चरस व माता डोंगरी।।धृ।।

गाय भिंगरीन शिंग जस महादेवन लिंग रे बा।

कृष्णानी गाय बरवी दुध भरुन देती चरवी।

उभीच माता तिरवी।।

मंग शिंगना जागांवर ईतर एक एक अवयव नी दही दूध तूप लोणी लिसनी एक एक कडवं म्हणो.

हाऊ अहिराणीना खूप मोठा आरस्तोल से. सम्राट शालिवाहन नंतर राजदरबरमा अहिराणीना आवडामोठा मान सन्मान दुसरा कोणी करा नही. म्हणीसन सयाजी महाराजनी जयंती जागतिक अहिराणी गौरव दिन म्हणीसनी साजरी कराना संकल्प आपिन करेल से. तो आपुन बठा अहिर एकमझार ईसनी पुरा करूत.

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page