top of page

मुस्लिम लाडी वाणी

  • dileepbw
  • Oct 27, 2022
  • 2 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

लाड सका/शाखीय वाणी समाजाचे हे Kindred Scythians/Eastern Scythians वंशाचे पूर्वज अफगाणिस्तानात "लाडी(Ladi) या नावाने ओळखले जातात व त्यांच्या वसतीस्थानाला "Sakastan" म्हणून ओळखले जाते.त्यापैकी मुस्लीम धर्म स्वीकारलेल्या सका लोकांना अफगाणिस्तानात "इशक(Ishak)" किंवा "Sagpae/Sagpue Hazara" म्हणून ओळखले जाते व त्यांच्या वसतीस्थानाला "Sagistan" असे म्हणतात.

(H.W.Bellew)

या लोकांचा व्यापार दोन वशिंडे असलेल्या बॅक्ट्रीयन उंटावरून किंवा घोड्यांवरून चालत असे.सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा उंटांचे तांडे (कारवाँ/Karvan/Caravans) सुनसान वाळवंटातून व धोकादायक दर्‍या-खोर्‍यातून एकत्रितपणे वाटचाल करीत असत. त्यांना संरक्षण व सुविधा पुरविल्या बद्दल स्थानिक राज्यकर्त्यांना आर्थिक स्वरूपात कर भरावा लागत असे.

(Herodotus - Histories 5.52)

(Isidorus Characenus/ Isidore of Charax - Parthian Stations).

साधारणपणे एक दिवसाची उंटाची/घोड्याची चाल(सुमारे ३०-५० कि.मी.) लक्षात घेऊन तेवढ्या अंतरावर धर्मशाळा/Stations उभारली जात असत.तेथे निवास,भोजन,तबेले,कोठ्या अशा सोयी केलेल्या असत.

(Isidorus Characenus/Isidore of Charax)

अशा व्यापारी धर्मशाळांना इराणमध्ये कारवाँ सराय (Caravanserais) तर ग्रीक प्रांतात(Mesopotamia) "खान" व तुर्कस्तानात "हान्स(Hans)" असे म्हणत असत.या सुविधांचे जनकत्व पारशी राजा King Cyrus the Great याच्याकडे जाते.

(Xenophon - Xen. Cyrop. 8.6, 17)

(Prof. P. Lebigre and Dr E. Thompoulos,EVCAU -Ecole d’Architecture Paris Val de Seine researchers)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page