"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २५"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 2 min read
"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २५"
मणिपूर संघर्षामागचे "वंशशास्त्र व धर्मशास्त्र" तुम्हाला समजावून सांगीतले.या आधीच्या लेखमालेत मणिपूर संघर्षाचे बीजारोपण इ.स.१८७६ साली कसे झाले त्या "धर्मांतरणा" ची हकीकत सांगीतली.आज काही संकलित बातम्या व मुद्दे सांगतो.त्या नीट अभ्यासा व महिला अत्याचाराच्या बुरख्या आड दडलेला "आंतरराष्ट्रीय कावा" तुमचा तुम्हीच जाणून घ्या.वाचा.
१.एप्रिल महिन्याच्या अखेरीस मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू झाला ते लक्षांत घेता सरकार ने आठ दिवसाच्या आत अर्मीच्या ५५ तुकड्या मणिपूर मध्ये तैनात केल्या आणि ९००० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
२.मणिपूरच्या जनतेला पाहिजे ती रसद पुरवण्यासाठी सर्व काही केलं.
३.शेतकर्यांना सुरक्षितरित्या पेरणी करता यावी म्हणून सरकारने २००० हजार गार्ड तैनात केले.
४.जवळपास ५० हजार लोक सुरक्षित ठिकाणी आसाम रायफलने पोहचवले.मणिपूर मध्ये येणारे सर्व रस्ते आसाम रायफलने सुरक्षीत तर केलेच परंतु गाड्यांना पर्सनल प्रोटेक्शन देखील दिले.
५.मे महिन्यातच सरकारने मणिपूरसाठी दिल्लीवरून शेकडो डॉक्टरांची टीम व सोबत महत्वाच्या medicine पाठवल्या.
प्रेग्नेंट महिलांसाठी देखील सरकारने रिलीफ कॅम्प सुरू केले. सरकारने रिलीफ कॅम्प मध्ये ५० मुलांना सुरक्षीत ठेवले.
६.जून महिन्याच्या सुरवातीस मा.गृहमंत्री मणिपूरमध्ये गेले व तेथील कुकी,मुस्लिम,गोरखा,तमिळ संगम ह्या सर्व समाजातील लोकांसोबत मीटिंग घेऊन शांतता राखण्यासाठी आव्हान केलं.
७.मणिपूरसाठी सर्व गरजेच्या गोष्टी पोहचत आहेत की नाही ह्या बाबत मा.गृहमंत्र्यांनी मा.पंतप्रधानांना महिती दिली.सर्व पक्षीय मीटिंग घेऊन मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित ठेवण्याचे आवाहन केले.
८.मणिपूर मधील एका स्थानिक पक्षाने राहुल गांधींना पत्र लिहीले की मणिपूरमध्ये जी काही परिस्थीती उद्भवली आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे.
९.भाजपचे मणिपूर मधील आमदार आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यांवर उतरून परिस्थीती सांभाळत होते.सरकार ने मणिपूर मधील बेघर लोकांसाठी ३ तर ४ हजार
घरे राहण्यासाठी उपलब्ध करून दिली.स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन परिस्थिती सांभाळत होतें.
१०.शाळकरी मुलांचे टाळण्यासाठी सुरक्षततेची काळजी घेऊन शाळा परत सुरू केल्या.
या सर्व बातम्यांचा अभ्यास केला असता "मणिपूर संघर्ष" हा राजकीय संघर्ष नसून सामाजिक संघर्ष आहे हे लक्षात येते.
या बातम्यांवरून सरकारने काय केले ते पुरेसे स्पष्ट होते आहे.विरोधक काय करत आहेत ते आपण रोज पहातच आहोत.ते कुणाच्या आशिर्वादाने ? कशासाठी ? त्याने राष्ट्राचे कोणते हित साधणार ?




Comments