माझे गडप्रेम - हल्दीघाटी,उदयपूर,राजस्थान
- dileepbw
- Feb 15, 2022
- 2 min read
उदयपूर येथील रक्तपेढीविज्ञानाची परीषद आटोपून आम्ही तेथून ४० कि.मी.अंतरावरील,अरावली पर्वतराजीत असलेल्या महाराणा प्रताप व अकबर यांच्यात झालेल्या युध्दाचे "हळदी" सारख्या पिवळ्या मातीने पवित्र झालेल्या, युध्द स्थळ असलेल्या "हल्दीघाटी" ला भेट देण्यासाठी प्रयाण केले.
महाराणा प्रताप व अकबर यांच्यात दि.१८ जून,१५७६ रोजी झालेल्या या युध्दात भारतभूच्या आत्मसन्मानासाठी राणा पूंजा,झाला मान,हाकिम खान,ग्वालियर नरेश राम शाह तंवर इ.वीरांनी तसेच
महाराणा प्रताप यांच्या सुप्रसिद्धप्रसिद्ध घोड़ा "चेतक" यांनी आत्मबलिदान दिले.त्यामुळे हे युद्ध स्थळ,तलाई, शाहीबाग,हल्दीघाटी दर्रा,प्रताप गुफा,चेतक समाधी इ. ऐतिहासिक स्थळे पहाताना ऊर अभिमानाने भरून येतो.
यातील "चेतक" घोड्याचे स्मारक पहाताना तर आपण थक्क होऊन जातो.अकबराच्या ९०,००० च्या सेनेशी फक्त
१५,००० सैन्यानिशी लढताना या चेतक" घोड्याने तर कमालच केली होती.तोंडावर "हत्तीचा मुखवटा" धारण करून या घोड्याने थेट अकबरावरच चाल केली व आपले पुढचे दोन्ही खूर त्याच्या हत्तीवर रोखून धरले.त्यामुळे महाराणा प्रतापला अकबरावर भाला फेकता आला.तो अकबराने अंबारीच्या आड अडून चुकविला.या प्रयोगात अकबराच्या हत्तीच्या सोंडेतील तलवार मात्र "चेतक" घोड्याच्या मागच्या पायाला इजा करून गेली.तरीही या मोडक्या पायाने "चेतक" घोड्याने २८ फुट रूंदीचा खंदक एका उडीत पार करून महाराणा प्रताप यांचे प्राण वाचविले.धन्य त्या
चेतक" घोड्याची !
या युध्दानंतर महाराणा प्रताप यांनी जंगलात व डोंगरात राहून "गनिमी कावा" पध्दतीने अकबराला अगदी सळो की पळो करून सोडले होते.हा इतिहास मराठी साम्राज्य स्थापन करणार्या छत्रपती शिवाजी महाराज व स्काॅटलंडला स्वातंत्र्य मिळवून देणार्या विल्यम वाॅलेस यांच्या इतिहासाशी साधर्म्य सांगणारा आहे.
"गिनिमी काव्या" ने दीर्घकाळ अकबराला झुंजविलेल्या राणा प्रतापांना अखेर दिनांक २६ आक्टोबर,१५८२ रोजी "दिवेर-छापली,देवगढ, राजसमन्द,मगरांचल" येथील युद्धात निर्णायक विजय प्राप्त झाला व ते मेवाड प्रांताचे "महाराणा" झाले.या युध्दात ३६ हजार मुगल सैनिक शरण आले. राणा प्रतापांनी अकबराचा काका 'सुल्तान खां' याला येथेच कंठस्नान घातले व सेनापती बहलोलखान याला घोड्यासह उभा चिरला हे विशेष ! त्यामुळे मेवाड प्रांतात “मेवाड़ के योद्धा सवार को एक ही वार में घोड़े समेत काट दिया करते हैं।” अशी म्हण रुढ झाली.
करेंजोगमण्डी,गोकुलगढ़,उडेश्वरमहादेव मन्दिर,राताखेत युध्दभूमी,हाथीभाटा,राणाका ढाणा,पंचमहुआ,छापली (छापामार पद्धतिने युद्ध केलेले ठिकाण),गोरीधाम,
बस्सी(राणा प्रतापच्या वीरांची स्मृतीस्थळे) इ.ऐतिहासिक स्थळे येथे आजही पहायला मिळतात.





Comments