"मेरा नाम हैं शबनम"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"मेरा नाम हैं शबनम"
©दिलीप वाणी,पुणे
उदय व सपना यांनी आज सकाळी सकाळी "गुलाबांची फुले" पाठवताच पक्याने मनापासून आनंद व्यक्त केला व "नको ते फ्रांस,नको ते मणिपूर" अशा भावना व्यक्त केल्या.नेहेमी संगीतात रमलेल्या उदयने पण त्याचीच "री" ओढली.चंदू वारंवार "वास्तवाचे भान" आणून देत असला तरी ते काही गटाच्या पचनी पडत नाही.कोणाची "धर्मनिरपेक्षता" उफाळून येते,तर कोणाची "नास्तिकता" ! कुणाला "मानवता" आठवते तर कुणाला "अस्पृश्यता" ! कुणी डावा,तर कुणी उजवा ! कुणी कडवा तर कुणी (परकीयांचा) भxवा ! ही "रस्सीखेच" चालू ठेवण्यात काय अर्थ आहे बरे ? "रस्सीखेच" संपली की खेळणारे जातात निघून ! मागे काय उरते ? निव्वळ कडवटपणा ! त्यापेक्षा मी सकाळीच विचारलेला एक प्रश्न पुन्हा विचारतो व एक "संगीत खेळ" सुचवितो.पहा पटतो का ?
उदय व सपना यांनी आज सकाळी सकाळी पाठविलेली "गुलाबांची फुले" पाहून कुठला "उर्दू" शब्द आठवला ? असे मी विचारले होते.किमान टोपी तरी त्याचे बरोबर उत्तर देईल असे वाटले होते.पण नाही ! आता मीच सांगतो ! "शबनम" ! त्या गुलाबांवर डवरलेले "दवबिंदू" ! आता एक काम करा.डोके खाजवा व "शबनम" शब्द असलेली गाणी पाठवा पाहू पटापटा !
१.बारिश की रिमझिम सी बूंदों में
तुम शबनम सी लगने लगी
२.प्यास बुझ जाए तो शबनम ख़रीद सकता हूं
ज़ख़्म मिल जाएं तो मरहम ख़रीद सकता हूं
३.मेरे दिलके कारवाॅं को,ले चला है आज कोई
शबनमशी जिसकी ऑंखे थोडी जागी थोडी सोयी
(रफी - दुल्हन एक रातकी)
४.ये शाम हैं या हया हैं क्या हैं,नजर उठाते ही झुक गयी हैं
तुम्हारी पलकोंसे गिरके शबनम,हमारी ऑॅंखोमे रूक गयी हैं
(लता,गुलाम अली)
५.जब रातको शबनम रोती हैं,खो जाते हैं हम फरियादोंमें
(लता-दिल दिया दर्द लिया)
६.हालतपे मेरी चाॅंद तारे रो गये शबनम
(लता-)
७.शबनम भी रोये मैं वो दास्तान हूॅं
(मुकेश)
८.हस हसके तो बहारे शबनम को रुलाती हैं
(तलत-दाग)
९.मेरा नाम हैं शबनम
(आशा भोसले-कटी पतंग)
१०.शबनम घटा चांदनी बन जाती हैं
(लता-ड्रीमगर्ल)
११.कभी शोला,कभी शबनम,कभी दिल हो कभी धडकन
(केके-ये नैना,ये काजल)
१२.ऐसा करना था पिया,क्यु शबनम को शोला बनाया
(लता-ओ मेरे बैरागी भॅंवरा)
१३.तडपते दिलपे युॅं गिरती हैं,तेरे नजरसे प्यारकी शबनम
१४.नीले गगन के तले धरती का प्यार पले,शबनम के मोती फूलों पे बिखरे
(महेद्र कपूर-हमराज)




Comments