लिंगायत धर्म
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाज व लिंगायत धर्मातील "शैव" पंथीय वाणी समाज गेली काही वर्षे "रोटी-बेटी" व्यवहाराने एकमेकांशी सामाजिक दृष्ट्या जोडले गेले आहेत.
त्यामुळे या धर्माची तोंड ओळख लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना असली पाहिजे.
"लिंगायत" हा १२व्या शतकात स्थापना झालेला एक "शिवधर्म" आहे. लिंगायत हा भारतातील तिसरा मोठा धर्म आहे. या धर्माचे
अधिकतम उपासक कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरला, तमिळनाडू आणी भारतासह परदेशातही आहेत.
हा "एकेश्वरवादी" धर्म आहे. तामिळनाडु मध्ये हा धर्म "शिवाद्वैत" धर्म अथवा "विरशैव" धर्म म्हणून ओळखला जातो.
तर लाड सका(शाखीय) वाणी समाज हा "अनेकेश्वरवादी" हिंदू धर्मातील "विष्णू पूजक" असा "वैष्णव" समाज आहे. त्यामुळे हा समाज "तेहतीस कोटी देव" मानतो.
हे "तेहतीस कोटी देव" कोणते ?
बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो.मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे.
कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्ग-व्यवस्थापनासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांत ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत.
प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिली आहे.
अष्टवसूंची नावे -आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास .
अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
बारा आदित्यांची नावे -अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग,मित्र,वरूण,वैवस्वत व विष्णू
असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३
या ३३ प्रकारच्या देवांपैकी फक्त ११ रूद्रांमधील "शिव" या एकाच देवाला मानणारा "एकेश्वरवादी" धर्म म्हणजे "लिंगायत" धर्म !
वरील माहिती समस्त सका(शाखीय) वाणी समाज बांधवांकडे असावी या उद्देशाने दिली आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९२२०)




Comments