लिंगायत वाणी - बेटी व्यवहार
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "वैश्य" या वर्णाची वैशिष्ट्ये
"हिंदू" धर्मातील "गोत्र" ही संकल्पना "सगोत्री" विवाहास मान्यता देत नाही. तर "हिंदू" धर्मातील "जात" ही संकल्पना "विजातीय" विवाहास मान्यता देत नाही.
विवाह संबंध जुळविण्यातील या "सामाजिक" व अन्य "व्यावहारिक" अडचणी लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने, एका "सामाजिक अभिसरणा" ची सुरुवात म्हणून आपला "वैष्णव" पंथ या कामापुरता बाजूला ठेऊन "शैव" पंथाच्या "लिंगायत वाणी" समाजाशी गेल्या काही वर्षांपासून "बेटी व्यवहार" सुरु केले आहेत.
या "सामाजिक अभिसरणा" ची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील समस्त वाणी समाजांचा अभ्यास व परस्परांशी विचार विनिमय होणे गरजेचे आहे. फेसबुकवरील "HISTORY OF LAD SAKA(SHAKHIY) WANI SAMAJ" हा "सार्वजनिक अभ्यासगट" या कामासाठी मदतनीस ठरावा हीच प्रभूचरणी प्रार्थना !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments