लाड शाखीयवाणी समाजातील शेटिया
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय)वाणी समाजाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी समाजाची खासगी न्यायसंस्था "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी "जातपंचायत" या नावाने ओळखली जात असे व ती "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी समाजाने निवडून दिलेल्या "पाच पंचांच्या(शेटिया)" पुढाकाराने चालविली जात असे.
पुढे "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी समाजाच्या "जातपंचायती" चे स्वरूप अधिक व्यापक झाले व न्याय निवाडा फक्त "पाच पंचांच्या(शेटिया)" पुढाकाराने न होता समाजातील ५० -१०० प्रतिष्ठित लोकांच्या सहमतीने केला जाऊ लागला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी समाजातील काही "देशभक्त" तरुणांना अन्य जातीच्या बांधवांबरोबर "सहभोजन" केल्यामुळे "जाती बहिष्कृत" करण्याचा निर्णय रद्द करण्याचे श्रेय "लाडसक्का/लाड सका/लाड शाखीय" वाणी समाजातील समाजरत्न नामपुरचे "बागलाणचे बाबा" श्री. नरहर गोपाळ अलई यांचेकडे जाते.
आताच्या "सरकारी न्याय व्यवस्थे" त "जातपंचायती" चे स्थान "गौण" होत चालले असून नजीकच्या भविष्यकाळात ते "नगण्य" ठरणार आहे.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments