top of page

"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा इतिहास - इसवी सनाचे विसावे शतक"

  • dileepbw
  • Sep 7, 2022
  • 1 min read

इसवी सनाच्या "विसाव्या" शतकातील महाराष्ट्रातील "मध्यम वर्ग" हा प्रामुख्याने निम्नस्तरीय आर्थिक परिस्थितीतून उदयाला आलेला प्रगमनशील असा बुद्धीजीवी वर्ग होता. माझे तीर्थरूप प्रा.बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) हे त्याचे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "प्रातिनिधिक" असे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. (कृपया फोटो पहा)

आर्थिक सत्तेमुळे समाजात जमीनदार,सावकार,व्यापारी,उद्योजक अशा धनिकांचा जो दबदबा असतो,तसा तो महाराष्ट्रातील मध्यमवर्गीयांवर नव्हता.त्यामुळे समाज सुधारणेचे प्रागतिक विचार मांडताना प्रसंगी थोडे नमते घेऊन आणि सातत्याने आपला "बौद्धिक-सांस्कृतिक दबदबा" वाढवण्याचे प्रयत्न करून त्यांना आपल्या चळवळी पुढे न्याव्या लागल्या.

सुधारणावादी पुनरुज्जीवनवादाच्या उत्क्रांतीमार्गी पद्धतीने त्यांनी वाटचाल केली. कधी परकीय शासक व एतद्देशीय धनिक वर्ग यांच्यावर टीका करून,तर कधी त्यांच्याशी जुळते घेऊन मध्यमवर्गीयानी आपली उद्दिष्टे साकार करण्याचा प्रयत्न केला.

कनिष्ट वर्गाच्या,किंबहुना सर्व भारतीय जनतेच्या हितसंबंधांची जाणीव त्यांनी आपल्या विचारांद्वारे व कार्यांद्वारे वेळोवेळी व्यक्त केली.परंतु असे करताना आपल्या वर्गीय हितसंबंधांचे रक्षण व वर्धन करून आपली प्रभुत्वक्षेत्रे निर्माण करण्यावर मध्यमवर्गाने भर दिला. हा वर्ग महाराष्ट्रामधील प्रबोधनाचा कारक व वाहक ठरलाच,परंतु त्याने विविध बाबतीत देशाला नेतृत्व पुरविले आणि वैशिष्ट्य पूर्ण ऐतिहासिक भूमिका पार पाडली.

(संदर्भ"- भारतीय समाज विज्ञान कोश, संपादक - श्री.स.मा.गर्गे व अन्य).

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page