लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाचा राजा "तिसरा रूद्रसिंह"
- dileepbw
- Sep 23, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाचा "तिसरा रूद्रसिंह" हा भारतातील शेवटचा "सका" वंशाचा राजा इसवी सन ३९५ साली होऊन गेला.
त्यानंतर भारतामध्ये अनेक सत्तांतरे झाली. इसवी सन ४०५ साली राजस्थान-गुजरात मध्ये सत्तेवर असलेले "सका" वंशाचे "दक्षिण सत्राप" हे राजे सत्तेवरून पायऊतार झाले व पुढे सत्ता क्रमाक्रमाने कुशाण, पर्शियन (सासानियन),श्वेत हूण(हॅप्थेलाईट/येत्झी), रईस(सिंध), गांधार(तांग), कर्कोटस,काबूल(शाही), मौर्य,सातवाहन,शुंग,कण्व,महामेघवाहन,भारशीव,गुप्त,वाकाटक,हर्षवर्धन,गुर्जर,विष्णूकुंडीन,चालूक्य,पुलकेशी, मैत्रक,गुर्जर प्रतिहार, राजपूत,कटोच, चौहान,कछवाहा,परमार,सोळंकी, तोमर,पाल,चंद इ. घराण्यांकडे गेली.
उत्तर भारतातील "सका" लोकांचे असे सत्तांतर होत असताना पूर्व भारताची सत्ता क्रमाक्रमाने सेन,वर्मन,म्लेंच्छ,पाल व त्विप्र या घराण्यांकडे सत्तांतरित होत होती.
दक्षिण भारताची स्थिती देखील वेगळी नव्हती. तेथे सत्ता "सका" लोकांकडून संगम,चेरा,काळभ्रस,कदंब,बदामी चालूक्य,पल्लव,पूर्वी चालूक्य, पांड्य, राष्ट्रकूट,पश्चिम चालूक्य,यादव,काकतीय,कलाचुरी,होयसाळ व चोला घराण्यांकडे हस्तांतरित होत होती.
या सर्व सत्तांतराचा लाड सका(शाखीय) वाणी समाजावर दीर्घ कालिन परिणाम झालेला आहे. त्याचा नीट अभ्यास केल्यास या समाजाला आपल्या प्रगतीच्या वाटा निश्चितच सापडतील.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी,M.D.(Pathology) (देव,भडगावकर)
व्यवस्थापक, फेसबुकवरील "'History of Lad Saka (Ladshakhiy) Wani Samaj" हा अभ्यासगट
(सभासद संख्या - ५६२०)




Comments