top of page

वृक्षपूजन

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 3 min read

हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "तुळशी विवाह" ही एक महत्वाची प्रथा.सर्वांना या सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

"तुळशी विवाह" या सणाच्या निमित्ताने या प्रथेची वैज्ञानिक माहिती घेणे व कालानुरुप हा सण साजरा करण्यात यथायोग्य बदल करणे हे समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाजासाठी नक्कीच हितावह राहिल.

"वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे आराध्य दैवत "विष्णू" व त्यांचा "तुळशी" शी विवाह म्हणजे जनजागृतीची एक मोठीच पर्वणी ! या दैवी विवाह प्रसंगी समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी "विवाहपूर्व थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही तपासणी करून मगच विवाह योग जुळविण्याचा संकल्प केल्यास हा समाज "थॅलेसेमियामुक्त" झाल्याशिवाय रहाणार नाही.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे प्राबल्याने वास्तव्य असलेल्या "खानदेशा" त या प्रथेला "राणूबाईचे पूजन" असे म्हटले जाते.एक आठवडा चालणाऱ्या या "राणूबाईच्या विवाह" सोहळ्यात राणूबाईची कणकेची मूर्ती तयार केली जाते व अगदी "मंगळसूत्र(पोयते)" घालून तिचा विवाह मोठा धूमधडाक्यात साजरा केला जातो.

(संदर्भ:- BG xii. 51).

"तुळशी विवाह" या संकल्पनेची पौराणिक व वैज्ञानिक माहिती खालील प्रमाणे :-

जसे जसे लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झाले व शेती करून स्थिर जीवन जगू लागले तसे तसे "अन्न व आसरा" देणारे "उपयुक्त वृक्ष" लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात पूजनीय ठरू लागले.अशा वृक्षांची जाणीवपूर्वक लागवड व जोपासना करण्यात येऊ लागली.त्याला लाड सका(शाखीय) वाणी समाजात "देवराई" असे म्हणतात.

"वड" या वृक्षाला लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात अनन्य साधारण महत्व आहे.घनदाट सावली देणारा व पारंब्यांमुळे व्यापार करण्यासाठी नैसर्गिक बैठक(विनामूल्य गाळा) देणारा "वडाचा पार" हा मीठ-मिरचीचा किरकोळ व्यापार करणाऱ्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाला निसर्गाने दिलेले वरदान आहे.त्यामुळे वड,पिंपळ, उंबर अशा एकाच प्रकारच्या वृक्षांवर "देवां" चे वास्तव्य असते अशी लाड सका(शाखीय) वाणी समाजाची श्रद्धा आहे.अशा वृक्षांखाली मांडलेल्या ओबड-धोबड धोंड्यांच्या स्वरुपात(वड देखण्या,ग्राम देवता इ.) या देवांचे पूजन केले जाते.

(संदर्भ:- Encyclopedia of Religion and Ethics,Edited by James Hastings, M.A., D.D. ,Fellow of the Royal Anthropological Institute with the assistance of John A. Selbie, M.A., D.D. and Other Scholars - Volume V - Dravidians -Fichte,Edinburgh)

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या "भू" मातेचे "दायूस" या देवतेशी दरवर्षी लग्न लावून दिल्यास तिची उत्पादन क्षमता(कस) वाढेल या संकल्पनेमुळे लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "तुळशी विवाह" ही प्रथा सुरु झाली असावी असे वैज्ञानिकांना वाटते.

(संदर्भ :- Crooke, Tribes and Castes, iii. 435, 447).

"तुळशी विवाह" या धार्मिक संकल्पनेमागचे वैज्ञानिक कारण शोधायचे झाल्यास "श्री.फ्रेझर" या समाजशास्त्रज्ञाच्या संशोधनाचा अभ्यास करावा लागेल.(संदर्भ :- Crooke, PR ii. 115ff.).

वृक्षाची "प्रजनन क्षमता (Reproductivity)" नवदाम्पत्याच्या मनावर ठसविण्यासाठी ही प्रथा उदयाला आली असावी असे "श्री.फ्रेझर" यांचे मत आहे.त्याच प्रमाणे या नव दाम्पत्याच्या पुनरुत्पादन क्षमतेमध्ये काही बाधा होऊ नये यासाठी हे पूजन केले जात असावे.(संदर्भ:- Frazer,GJS i.195 f.).

(संदर्भ:- Encyclopedia of Religion and Ethics,Edited by James Hastings, M.A., D.D. ,Fellow of the Royal Anthropological Institute with the assistance of John A. Selbie, M.A., D.D. and Other Scholars - Volume V - Dravidians -Fichte,Edinburgh)

"वृक्ष पूजन(पिंपळ पूजन,वड पूजन,तुळशी पूजन इत्यादी)" या प्रथेचा उगम "वृक्षांनाही जीव असतो" या संकल्पनेतून उदयाला आला आहे.ग्रीष्म ऋतूमध्ये वठलेला वृक्ष शरद ऋतूत पुन्हा पालवी फुटून बहरात येतो या नैसर्गिक निरीक्षणातून वृक्षांनाही "जीव" असतो ही संकल्पना लाड सका(शाखीय)वाणी समाजात उदयाला आलेली आहे.समाजाला "उपयुक्त" असलेले विविध "औषधी गुणधर्म" व "पोषण मूल्य" असलेले वृक्ष त्यामुळेच लाड सका(शाखीय) वाणी समाजात पूजनीय आहेत.तसेच समाजाला "विघातक" असलेल्या गोष्टी वृक्षावर नांदत असलेल्या दुरात्म्यांमुळेच(उदा.पिंपळारील मुंजा,भुते,प्रेते इ.) घडतात असा समज मध्य आशियात वास्तव्याला असताना लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांमधे होता.

अशी पौराणिक व वैज्ञानिक पार्श्वभूमी असलेल्या "तुळशी विवाह" या सणाच्या समस्त लाड सका (लाड शाखीय) वाणी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page