विवाह समस्या - गल्लाभरू मध्यक्ष
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
विवाह बंधनाने एकत्र आलेल्या "वैष्णव" पंथीय "लाड सका(शाखीय)" व "शैव" पंथीय "लिंगायत" वाणी समाजाचे संयुक्त संमेलन नुकतेच संपन्न झाले.
लाड सका(शाखीय) वाणी समाजात आता पर्यंत "लिंगायत" वाणी समाजाच्या सुमारे ३००० "सोलापूर सखी" समाविष्ट झालेल्या आहेत.त्या पैकी नाशिक शहरातील सुमारे ३५० सखी संघटीत झाल्या असून त्यांनी धंदेवाईक व गल्लाभरू मध्यस्थांना दूर सारून स्वत: पुढाकार घेऊन असे संमिश्र विवाह जुळविण्याचा समाजोपयोगी निर्णय घेतला आहे.
या सामाजिक कार्यात अग्रणी असलेले लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे अग्रणी मा. श्री. सुनीलतात्या नेरकर यांनी या कार्यक्रमात अशा संमिश्र विवाहात येणार्या अडचणी कथन करून मध्यस्थांकडून होणारी आर्थिक पिळवणूक समाजासमोर आणली व आता सोलापूर सखींनीच समजूतदारपणा दाखवून व स्वत: पुढाकार घेऊन गल्लाभरू मध्यस्थांना बाजूला सारण्याचे आवाहन केले.
"सोलापूर सखी" समजूतदार व सुसंस्कारित असून त्यांना लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सामावून घेतले जाईल अशी घोषणा लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री.राजेशजी कोठावदे यांनी केली.
लाड सका(शाखीय) वाणी मित्र मंडळ,नाशिकचे अध्यक्ष मा. श्री. सचिन बागड यांनी सोलापूर सखींच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या नाशिक मनपाच्या नगरसेविका मा. सौ. रत्नमाला राणे यांनी सोलापूर सखींचे गुण विशेष सांगीतले व त्यांचे लाड सका (शाखीय) वाणी समाजात स्वागत असल्याचे आवर्जून सांगीतले.तसेच सोलापूर सखींनी या पुढे आपण लाड सका (शाखीय) वाणी सखी असल्याचेच समजावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाची व्याप्ती अशीच वर्धिष्णू असावी याच शुभेच्छा !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९२०२)




Comments