top of page

वड-बनयान ट्री

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

"पिलखोड" च्या ज्या "देव व शिरोडे" समाजबांधवांकडे काहीच भांडवल न्हवते त्यांनी सरळ जवळच्या शहरांचा(म्हणजे चाळीसगाव, धुळे, पाचोरा, भडगाव, मालेगाव, मनमाड, नांदगाव, औरंगाबाद इ.) रस्ता पकडला.

तेथे डोक्यावर पेलवेल एवढे धान्याचे गाठोडे खरेदी केले.पहाटे उठून जवळच्या खेड्याचा रस्ता धरला. प्रवासाने दमल्याने घामाघूम होत,धुळीने माखलेल्या चेहेऱ्याने,उपाशीपोटी गावच्या "देवळाचा पार" गाठला. हेच त्यांचे "बिनभाड्याचे दुकान" होते.

आणलेले धान्याचे गाठोडे सोडून,ग्रामस्थांच्या गरजेनुसार त्याचे छोटे छोटे भाग करून विकायला सुरवात केली.

सगळे धान्य संपेपर्यंत,तहान भुकेची,उन्हा पावसाची,निसर्गधर्माची,कसलीही पर्वा न करता पारावर "ठिय्या" द्यायला सुरवात केली.

"वड,पिंपळ,उंबर" अशा पारावरील झाडांची सावलीच त्यांच्या सोबतीला होती.

पारावरील "तात्पुरत्या" दुकानदारीचे हे दृश्य पाहूनच परदेशातून व्यापारासाठी भारतामध्ये आलेल्या पोर्तुगीजानी(इ.स.१५९९ साली) व ब्रिटिशांनी(इ.स १६३४ साली) "वड,पिंपळ,उंबर" या बनिया लोकांना विनामोबदला सावली व दुकान अशा दोन्ही गोष्टी देणाऱ्या वृक्षांना “Banyan Tree" म्हणजे "बनियाचे झाड" असे म्हणायला सुरवात केली.

या "बनियाच्या झाडा" ला पुढे भारताचा "राष्ट्रीय वृक्ष" होण्याचा मान मिळाला व आजही आधुनिक वनस्पतीशास्त्रामध्ये “Banyan Tree" हेच टोपण नाव कायम ठेवण्यात आलेले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page