वडपूजन
- dileepbw
- Oct 7, 2022
- 4 min read
"वडाचे झाड"
दसर्यानिमित्त ओरबाडल्या जाणार्या "आपट्या" च्या वृक्षाला वटपौर्णिमेनिमित्त तोडल्या जाणार्या वटवृक्षाने वेदनेने कासावीस होत काय विचारले असावे ? वाचा या कवितेत !
दुखतंय का रे जास्त..?
तुझ्याही फांद्या,तुझीही पानं,
माणसाने केली ना ध्वस्त...
वर्षातून एक दिवस,
म्हणे आपला असतो मान,
कुणी विचार करतो का,
आपल्यातही असतो प्राण...
त्यांचा उत्सव साजरा होतो,
आपली म्हणे होते पूजा,
त्यांना कुठे कळतेय मित्रा,
आपल्याला होणारी ईजा..
पूर्वी बांधायचे दोर वडाला,
आता फांद्या तोडून नेतात,
लचके तोडून त्याच वडाला,
काय तर म्हणे देव म्हणतात..
गरजेपेक्षा जास्त किती,
तोडतात फांद्या नी पाने,
निर्जीव झालेल्या पानांना,
मग म्हटलं जातं "सोने"
दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,
फक्त पालापाचोळा होतो,
कालचा देव आज मात्र,
पायदळी तुडवला जातो...
कसली म्हणायची श्रद्धा ही,
कसली रे ही भक्ती,
स्वतःला नी निसर्गाला,
फसवायचीच ही युक्ती...
विरोध नाही आमचा कुठल्या,
चाली रीती प्रथांना,
पण बघवत नाही निसर्गाचा,
ऱ्हास उगा होताना
आपण कधी स्वतःला,
देव म्हणवून घेत नाही,
खूप आहेत दुःख आपली,
पण बोलता येत नाही...
आपण देतोय भरभरून,
त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,
सण साजरे करावे पण,
आम्हालाही जगू द्यावं...
- एक वृक्ष
ही संवेदनशील कविता वाचून मला फारच हळहळ वाटली व वैष्णव पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाच्या "वडाचे झाड" या "कुलचिन्ह(देवक)" बाबत दोन शब्द लिहावेसे वाटले.
"वडाचे झाड" हे माझ्या समाजाचे कुलचिन्ह (देवक) ! अवाढव्य विस्तार असल्यामुळे व्यापार उदीम करण्यासाठी ऐस पैस सावली देणारे व पारंम्ब्यांमुळे वेगवेगळी दुकाने एकाच ठिकाणी थाटण्यासाठी नैसर्गिक खोल्या देणारे "वडाचे झाड" हे माझ्या "देव" कुलाचा पारंपारिक व्यवसाय असलेल्या "किराणा मालाची किरकोळ विक्री" या व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त असे.अशा झाडा भोवती बांधलेला "पार" हे एकेकाळी माझ्या समाजाचे खास वैशिष्ट्य असे.
प्राचीन काळी मध्य आशियात वास्तव्याला असणारे, शिकारी व आदिवासी जनजीवन जगणारे माझे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज,सामाजिक स्थिरतेसाठी "कुलचिन्ह (देवक)" ही एक संकल्पना पाळत असत.त्या काळी "धर्म संकल्पना" अस्तित्वात नसल्यामुळे तेव्हा फक्त "निसर्गपूजन" चालत असे."कुलचिन्ह (देवक)" या संकल्पनेला तेव्हा "देवा" इतकेच महत्व असे. त्यामुळे "वडाचे झाड" हे आमच्यासाठी देवच आहे. या वडाच्या झाडाने आम्हाला सदैव संरक्षणच दिलेले आहे.म्हणून तर आम्ही त्याला आमचे "कुलचिन्ह(देवक)" मानतो.वर्षातून एक दिवस त्याचा मोठा "मान" ठेवतो.
वडाच्या झाडात देखील प्राण असतो अशीच आमची भावना आहे.वडाच्या झाडाला "ईजा" पोहोचवणे म्हणजे आमच्या या भावनेला "ईजा" पोहोचवण्या सारखेच आहे.त्यामुळे "वटपूजन" हा उत्सव अता वडाची फांदी तोडून तिचे पुजन करण्याऐवजी "वटवृक्षाचे रोपण" करून हा सण साजरा करण्याची प्रथा माझ्या समाजात रूढ होऊ लागली आहे,हे सांगायला आनंद वाटतो.
आता तुम्हाला "कुलचिन्ह(देवक)" म्हणजे काय ते समजावून सांगतो."कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीपासून आपली "उत्पत्ती" झाली आहे असे मानून व त्यामुळे आपला चरितार्थ चालतो याची जाणीव ठेवून अशा गोष्टीची "पूजा" केली जाते. "कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीची हानी होईल असे कोणतेही कृत्य केले जात नाही.त्यामुळे वडाच्या फांद्या तोडून त्याचे पुजन करण्यापेक्षा वटवृक्षाचे रोपण करणे कधीही योग्य !
"वडाचे झाड" या "कुलचिन्ह(देवक)" ला "देव" कुलाचा रक्षणकर्ता मानून मंगल प्रसंगी त्याची आदर पूर्वक पूजा केली जाते.त्यामुळे "वड पूजन" हा हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा एक अत्यंत महत्वाचा संस्कार समजला जातो.लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात एकच "कुलचिन्ह(देवक)" असणाऱ्या स्त्री-पुरुषात विवाह संबंध होऊ शकत नाहीत."वडाचे झाड" हे देव कुलाच्या पारंपारिक व्यवसायाचे म्हणजे व्यापाराचे साधन (डिपार्टमेंटल स्टोअर) असल्याने तेच त्यांचे "कुलचिन्ह(देवक) आहे.
(संदर्भ :-लाड शाखीय वाणी समाजाचे सण - वडपूजन,चैतन्यदीप).
"कुलचिन्ह(देवक)" प्रथेला त्याकाळी जरी धर्मसंस्थेचे स्वरूप प्राप्त झालेले नव्हते तरी धर्मसंस्थेचे काही घटक या प्रथेत आढळून येतात. विशेषतः यातूविद्येशी "कुलचिन्ह(देवक)" प्रथेचा निकटचा संबंध असला पाहिजे.पूर्वजपूजा(देव कुलामध्ये प्रचलित असलेली वडाच्या झाडाखाली मांडलेल्या पूर्वजांच्या मूर्ती उर्फ "वडदखन्या"), मृतात्म्यावरील विश्वास,एखाद्या दिव्य शक्तीचे अस्तित्व मानणे या सर्व गोष्टींचे "कुलचिन्ह (देवक)प्रथे" शी धागेदोरे जुळतात.
धुळ्याची "एकविरा माता" हे हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे" सामूहिक कुलचिन्ह (देवक)" मानले जाते. "एकविरा माताजी" यांना संपूर्ण "देव" कुलाचाच आधार मानण्याची प्रथा आहे. "सामूहिक कुलचिन्ह(देवक)" आणि "व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" परस्परांहून भिन्न मानण्याचीही प्रथा "देव" कुलामध्ये आढळून येते.
"व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" वंश परंपरेने "देव" कुलातील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते."देव" कुलातील समाज बांधव एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी अथवा वनस्पती यांचा संबंध व्यक्तिगत पातळीवरही आणू शकतात. अशा प्रकारचे "कुलचिन्ह" त्या समाज बांधवाला काही "अलौकिक/दैवी" अशी शक्ती प्राप्त करून देते असा समज आहे.
आदिवासी जनजीवनातील "कुलचिन्ह(देवक)" ही एक महत्वाची "सामाजिक संस्था" आहे.काही आदिवासी जमातीत सुसंघटीत अशी धर्मसंस्था अस्तित्वात नसली तरी "कुलचिन्हा(देवक)" मुळे ही उणीव भरून निघाली आहे."कुलचिन्हा(देवक)" ला देवा इतकेच महत्व आहे.या "कुलचिन्हा(देवक)" पासून आपली उत्पत्ती झाली आहे व त्याचे आपल्याला सदैव संरक्षण असते अशी धारणा आहे.
"कुलचिन्ह(देवक)" प्रथेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे प्राण्यापासून किंवा वस्तूपासून आपली उत्पत्ती झाली आहे असे मानून त्या गोष्टीशी आपला गूढ संबंध मानून त्याची पूजा केली जाते. अशा "कुलचिन्हा(देवक)" ची कधीही हत्या केली जात नाही. त्याला घराण्याचा "रक्षणकर्ता" मानून मंगल प्रसंगी त्याची आदर पूर्वक पूजा केली जाते. एकच "कुलचिन्ह (देवक)" असणाऱ्या स्त्री-पुरुषात विवाह संबंध होऊ शकत नाहीत."वडाचे झाड" हे "देव" कुलाच्या पारंपारिक व्यवसायाचे म्हणजे व्यापाराचे साधन (डिपार्टमेंटल स्टोअर) असल्याने तेच आपले "कुलचिन्ह(देवक)" आहे.
(संदर्भ :-लाड शाखीय वाणी समाजाचे सण - वडपूजन,चैतन्यदीप).
"कुलचिन्ह(देवक)" प्रथेला धर्मसंस्थेचे स्वरूप प्राप्त झालेले नसले तरी धर्मसंस्थेचे काही घटक या प्रथेत आहेत.विशेषतः यातूविद्येशी "कुलचिन्ह(देवक)" प्रथेचा निकटचा संबंध असला पाहिजे. "पूर्वजपूजा(देव कुलामध्ये प्रचलित असलेली वडाच्या झाडाखाली मांडलेल्या पूर्वजांच्या मूर्ती उर्फ "वडदेखन्या"), मृतात्म्यावरील विश्वास, एखाद्या दिव्य शक्तीचे अस्तित्व मानणे या सर्व गोष्टींचे "कुलचिन्ह(देवक)" प्रथेशी धागेदोरे जुळतात."सामूहिक कुलचिन्ह(देवक)" संपूर्ण कुलाचाच आधार मानण्याचीही प्रथा आहे. "सामूहिक कुलचिन्ह(देवक)" आणि "व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" परस्परांहून भिन्न मानण्याचीही प्रथा आहे. "व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" वंश परंपरेने एका पिढीकडून दुसरया पिढीकडे संक्रमित होते. एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी अथवा वनस्पती यांचा संबंध व्यक्तिगत पातळीवरही असू शकतो. अशा प्रकारचे कुल चिन्ह व्यक्तीला काही अलौकिक अशी शक्ती प्राप्त करून देते असा समज आहे.
(संदर्भ:- भारतीय समाज विज्ञान कोश, संपादक - श्री.स.मा.गर्गे व अन्य).
आदिमानव अवस्थेत "मरण" म्हणजे नेमके काय याची आदिमानवाला जाणीव नव्हती. आदिमानव जसा प्रगत होत गेला तशी त्याला "मृत्यू” म्हणजे काय याची जाणीव झाली. त्यातून त्याला "जीव/आत्मा" ही संकल्पना सुचली असावी.आपल्याला जगवणाऱ्या वनस्पतीला(लाड सका/लाड शाखीय वाणी समाजाच्या बाबतीत "वडाचे झाड/Banayan Tree)" किंवा प्राण्याला(लाड सका/लाड शाखीय वाणी समाजाच्या बाबतीत "गाय") त्याने आपले "कुलचिन्ह" केलेलेच होते.त्यात "जीव/आत्मा" या नव्या कल्पनेची भर पडली.
"कुलचिन्ह" व "जमातीचे सदस्य" यांच्यात एकच "जीव/आत्मा" वास करीत असावा. "कुलचिन्ह" भक्षण केल्यास त्याचा "जीव/आत्मा" जमातीच्या सदस्याच्या जीवाशी एकरूप होत असावा व त्यामुळे त्याला बळ प्राप्त होत असावे.असे आदिमानवाला वाटू लागले.या विचारातूनच आदिमानवाला "पूर्वज" ही नवी संकल्पना सुचली असावी."जमातीचे सदस्य" मेल्यानंतर त्याचा "जीव/आत्मा" "कुलचिन्हाच्या" जीवाशी एकरूप होत असावा असे त्याला वाटू लागले. अशा प्रकारे जमातीचे सदस्य असलेल्या सर्वांचे "जीव/आत्मा" मेल्यानंतर "कुलचिन्हाच्या" "जीव/आत्मा"शी एकरूप झाले व त्यातून "पूर्वज" ही नवी संकल्पना उदयाला आली असावी."लाड देश/लाट देश/गुजरात प्रांत" येथील,"सका/शक/Scythian" वंशाच्या व्यापाऱ्यांच्या म्हणजे "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजा" तील "वडपूजन(वड देखन्या)" व तेथे तांदळ्याच्या(न घडवलेल्या दगडाच्या मूर्ती) स्वरुपात मांडलेल्या "पूर्वजांचे पूजन" ही प्रथा याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
आदिमानव जसजसा प्रगत होत गेला तसतसे अन्न मिळविण्याचे पशुपालन व शेती हे मार्ग उपलब्ध झाले.त्यामुळे कुलचिन्हाचे "अन्नदाता" हे महत्व कमी कमी होत जाऊ लागले.पण त्याचे "आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचे एकत्रीकरणाचे स्थान" हे भावनिक महत्व मात्र वाढू लागले.अशा तर्हेने अन्नाचे अन्य मार्ग उपलब्ध झाल्याबरोबर कुलचिन्हाचे "अन्नदाता" हे महत्व संपले पण "पूर्वज" म्हणून त्याचे महत्व वाढले.त्यामुळे आता "कुलचिन्ह" हा "भक्षणा" चा विषय न रहाता "पूजना" चा विषय झालेला आहे.




Comments