वर्णसंकर
- dileepbw
- Oct 4, 2022
- 2 min read
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
लाड सका/शाखीय वाणी समाजाच्या या "सका/शक/Scythian" पूर्वजांबाबत विविध वैद्यकीय व शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झालेले संशोधन समस्त लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांच्या माहितीसाठी प्रसृत करीत आहे.
इ.स.२०१९ साली Current Biology या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार युरोपकडे स्थलांतरित झालेल्या मध्य आशियातील Scythians तसेच Cimmerians व Sarmatians लोकांचा युरोपियन लोकांशी वर्णसंकर सुरू झाला.तर इ.स.२०१९ साली "Human Genetics" या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार "Aldy-Bel संस्कृती" च्या काळात मध्य आशियातील सका लोकांचा पूर्व आशियातील लोकांशी वर्ण संकर झाला होता.या संशोधनात युरोप जवळील सका लोक व चीन जवळील सका लोक यांच्या पितृत्वात जमीन अस्मानाचा फरक आढळून आलेला आहे.इ.स.२०१८ साली झालेल्या जनुकशास्त्रीय संशोधनानुसार(PLOS One) "Tagar culture" या पूर्व आशिया येथील सका संस्कृतीमधील लोक हे मध्य आशिया व युरोप जवळील पश्चिम आशियातील लोकांच्या वर्णसंकरातून निर्माण झालेले होते.तर इ.स.२०१८ साली Science Advances या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार मध्य आशियातील सका संस्कृतीमधील Srubnaya,Cimmerians,Scythians व Sarmatians हे लोक Yamnaya,Afanasievo व Andronovo या उत्तरेकडील संस्कृतींमधील लोकांशी अनुवंशिकदृष्ट्या मिळते जुळते आहेत.
तर पूर्व आशियातील Aldy-Bel व Pazyryk या सका संस्कृतीमधील लोक अनुवंशिकदृष्ट्या Yamnaya संस्कृतीमधील लोकांशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले आहे.
या सर्व संशोधनांवरून असे लक्षात येते की मध्य आशियातील सुरूवातीला शुध्द वर्ण असलेल्या सका लोकांचा वर्णसंकर हा प्रामुख्याने युरोप जवळील पश्चिम आशियातील (Pontic–Caspian steppe व southern Urals) लोकांशी झाला आहे. इ.स.२०१७ साली Scientific Reports या नियतकालिकेत प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार युरोप जवळील सका पुरूष व मध्यपूर्व आशियातील स्त्रिया यांच्या संकरातून
Srubnaya संस्कृतीमधील सका लोकांची निर्मिती झाली.Nature या शास्त्रीय नियतकालिकांमध्ये इ.स.२०१५ व २०१७ साली प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार सका लोकांची निर्मिती Afanasievo, Andronovo व Yamnaya या संस्कृतींमधील सका लोकांच्या वर्णसंकरातून झाली आहे.Samara Oblast,Russia येथील उत्खननात सापडलेल्या इ.स.पूर्व ३८०-२०० या काळातील अवशेषांवरून सका लोकांची निर्मिती Srubnaya व Yamnaya
संस्कृतीमधील लोकांपासून झाल्याचे आढळून आले आहे.
या सर्व संशोधनावरून भारतात स्थलांतरित होण्यापूर्वीच "सका/शक/Scythian" लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर "वर्णसंकर" झाला असल्याचे लक्षात येते.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments