top of page

वसुबारस

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा पारंपारिक सण - "वसुबारस"

"गोवत्सद्वादशी/अश्विन कृष्ण द्वादशी या तिथीला "वसुबारस" हा सण साजरा केला जातो.

"वसुबारस" ह्याचा अर्थ - "वसु" म्हणजे द्रव्य/धन व त्यासाठी असलेली "बारस म्हणजे द्वादशी" !

या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.

व्यापार हा पारंपारिक व्यवसाय असलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवाच्या घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने ही या दिवशी "सवत्स धेनू" ची पूजा करण्याची पद्धत आहे.

चलनाचा(नोटा,नाणी इ.) शोध लागायच्या आधी संपत्तीची मोजणी गाई (गोधन), कणसे(धान्य) व तूप या तीन पीत वर्ण गोष्टींने केली जात असे.

त्यामुळे लाड सका(शाखीय) वाणी हा व्यापारी (वैश्य) समाज "पीत" म्हणजे पिवळ्या रंगाने निर्देशित केला जात असे.

ज्यांच्या घरी गुरे,वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून, फुलांची माळ गाईंच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग, दूध, दुधाचे पदार्थ व तळलेले पदार्थ खात नाहीत.

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.

स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

काही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात

तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन

केले जाते.

या दिवशी आपल्या अंगणातील गाईला "वासवदत्ते" चे स्वरूप प्राप्त होते. म्हणजेच तिचे एकप्रकारे "बारसे" होऊन तिला "देवत्व" प्राप्त होते.

यासाठीच या दिवसाला "वसुबारस" असे म्हणतात.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणज शेती व शेतीतून अतिरिक्त उत्पादन झालेले शेतीजन्य पदार्थ(उदा.धान्य,कडधान्य,डाळी इ.) व पाळीव प्राणीजन्य पदार्थ (उदा. दूध, दही, लोणी, तूप) यांचा व्यापार !

एका अर्थाने दुध-दुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग व शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा म्हणजे वसुबारस !

समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०११)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page