top of page

"वाणी" नावाची उत्पत्ती

  • dileepbw
  • Oct 21, 2014
  • 1 min read

Updated: Sep 5, 2022

मूळ "वाणिज्य" म्हणजे "व्यापार" या "संस्कृत" शब्दापासून आलेला "वाणिया/वाणियो" हा "गुजराती" शब्द विविध भारतीय भाषांमध्ये कसा बदलत गेला आहे ते पहा :-


बनिया, वाणिया, वाणी, बानी, वाणीयन, बणीकर, बाणजिग इ. तुर्की खलाशी "सिद्दी अली" ने त्याच्या “सास्सुई व पन्हू” (रोमिओ-जुलिएटची सिंधी प्रेमकथा) या काव्य संग्रहात भारतामधील सर्व हिंदू व्यापाऱ्यांचे नामाभिदान "वाणिया" असे केलेले आढळते (संदर्भ:- ग्रंथाचे नाव - सिंध, लेखक - श्री.बर्टन, पान नंबर -१०१ व Hobson Jobson - BANYAN - Page 1 - Bibliomania - free online literature and study guides).


"पोर्तुगीजां" नी त्यांच्या सर्वच शब्दांना "न(n)" जोडून "अनुनासिक" करण्याच्या सवयीमुळे, “बनिया” हा मूळ शब्द "बनियन" असा अपभ्रंशीत केला.

भारतीय "वाणी" लोकांसाठी पाश्चिमात्यांनी वापरलेला "बनियन" हा शब्द "पॉल सायमन(Paul Simon)" या जगदविख्यात संगीतकाराने आपल्या "The Rhythm of the Saints" या अल्बममध्ये, तसेच "मेलोरा क्रीगर (Melora Creager)" या महिला संगीतकाराने "Krakatowa" या आपल्या एकपात्री अल्बममध्ये वापरलेला आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र "The Economist" आजही आशियातील घडामोडी वर्णन करणारे सदर "Banyan/बनियन" या नावानेच चालविते.

Recent Posts

See All
कुलग्रामे व कुलनामे

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page