शेती-आपला प्राचीन व्यवसाय
- dileepbw
- Sep 9, 2022
- 2 min read
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
या संदर्भात "प्राचीन भारतातील लोक भारतात कुठून आले" हा श्री.अखिलेश पल्लालमर्री या संशोधकाचा दि.७ जानेवारी,२०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख वाचनात आला.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की इ.स.पू.३००० साली भारतातील स्थानिक आदिवासी (Ancient Ancestral South Indians - AASI) लोकांचा भारताच्या पूर्वेकडून(मंगोलिया,चीन) पश्चिमेकडून(इराण) व मध्यपूर्वेकडून (सायबेरिया) आलेल्या शेती वा पशुपालन करून जगणार्या लोकांशी वर्णसंकर झाला.त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मध्य आशियातील भटके जीवन जगणारे लोक(शक,कुशाण, हूण)भारतात आले.त्यांच्याशी देखील मोठ्या प्रमाणावर वर्णसंकर झाला.त्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीमधे या सर्वांचीच जनुके आढळून येतात.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments