"श्री ज्वाला माताजी,कांगडा,हिमाचल प्रदेश"
- dileepbw
- Sep 6, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाची "आद्य" कुलदेवता “श्री ज्वाला माताजी,कांगडा,हिमाचल प्रदेश"
जसे "सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचे "हिमाचल" मधून "राजस्थान" मध्ये स्थलांतर झाले तसे त्यांना नियमितपणे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील आपल्या "आद्य" कुलस्वामिनीचे(श्री ज्वाला माताजी, कांगडा, हिमाचल प्रदेश) दर्शन घेणे दुरापास्त झाले.
त्यामुळे त्यांनी आपल्या "राजस्थान" मधील नव्या वसतीस्थानाजवळ एक प्रतीकात्मक देवीचे स्थान जयपूर जिल्ह्यातील "जोबनेर" या शहराजवळ उभे केले.(कृपया फोटो पहा)
"जोबनेर" मधील एका टेकडीवर उभारलेल्या या "ज्वालादेवी" मातेच्या राजस्थानमधील प्रतिरूपामुळे अनेक श्रद्धाळू भक्तांची देवीचे दर्शन घेण्याची चांगली सोय झाली आहे. त्यासाठी आता हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे जायला नको.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments