श्री.विजय विखराणकर यांचा नाणी संग्रह - स्थलांतराचा मार्ग
- dileepbw
- Sep 17, 2022
- 3 min read
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
या "भारतीय शक/Indo-Scythians" राजांच्या नाण्यांचा संग्रह लाड सका(शाखीय) वाणी समाजातील इतिहासप्रेमी बांधव श्री.विजय विखराणकर करीत असून ज्यांच्या पूजेत/संग्रहात अशी नाणी असतील त्यांचे दोन्ही बाजूचे फोटो या अभ्यासगटात जरूर प्रसृत करावे. तसेच ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवाला संधी मिळेल त्यांनी श्री.विजय विखराणकर यांचा नाणी संग्रह अवश्य पहावा.ही नम्र विनंती.स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी "सका/शक/Scythian" साम्राज्याचा अभ्यास करताना तो आपल्या पूर्वजांचा इतिहास असल्याने बारकाईने अभ्यासावा.ही नम्र विनंती.त्यासाठी माझ्या वाचनात आलेली माहिती या अभ्यासगटात प्रसृत करण्यात आलेली आहे.
एरियन आणि क्लॉडियस टॉलेमी या प्राचीन ग्रीको-रोमन लेखकांनी "सका/शक/Scythian" लोकांचे वर्णन मध्य आशियातील "भटक्या व विमुक्त टोळ्या" असे केले असून ते शहरे न वसविता लेण्यांमध्ये रहात असत असे म्हटले आहे.या "सका/शक/Scythian" लोकांनी Achaemenid(पर्शियन/इराणी) सैन्यात सैनिक म्हणून काम केल्याचे उल्लेख आढळतात
"सका/शक/Scythian" लोक हे
मध्य आशियातील भटके इराणी लोक
इ.स.पूर्व दुसर्या शतकाच्या मध्यभागापासून ते इ.स.च्या चौथ्या शतकापर्यंत "युझी" जमातींकडून पराभूत झाल्याने क्रमाक्रमाने Sogdiana,Bactria, Arachosia,Gandhara,सिंध, काश्मीर,पंजाब,हरियाणा,उत्तर प्रदेश, बिहार ,राजस्थान,गुजरात आणि महाराष्ट्र येथे वास्तव्याला आले व तेथे त्यांनी २,६००,००० चौ.कि.मी. एवढ्या मोठ्या भूभागावर आपले
"सका/शक/Scythian" साम्राज्य प्रस्थापित केले.इ.स.पू.पहिल्या शतकातील भारतातील "सका/शक/Scythian" राजा "Maues/Moga" याने स्थापन केलेल्या या "सका/शक/Scythian" साम्राज्याचा नाश आंध्रचा
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सतकर्णी याच्याकडून नहपान या "सका/शक/Scythian" राजाच्या पराभवाने सुरू झाला व शेवटचा "सका/शक/Scythian" राजा "रुद्रसिम्हा तिसरा" याचा गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याने पराभव केल्याने तो तडीस गेला.
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
या "भारतीय शक/Indo-Scythians" राजांच्या नाण्यांचा संग्रह लाड सका(शाखीय) वाणी समाजातील इतिहासप्रेमी बांधव श्री.विजय विखराणकर करीत असून ज्यांच्या पूजेत/संग्रहात अशी नाणी असतील त्यांचे दोन्ही बाजूचे फोटो या अभ्यासगटात जरूर प्रसृत करावे.तसेच ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवाला संधी मिळेल त्यांनी श्री.विजय विखराणकर यांचा नाणी संग्रह अवश्य पहावा.ही नम्र विनंती.स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी "सका/शक/Scythian" साम्राज्याचा अभ्यास करताना तो आपल्या पूर्वजांचा इतिहास असल्याने बारकाईने अभ्यासावा.ही नम्र विनंती.त्यासाठी माझ्या वाचनात आलेली माहिती या अभ्यासगटात प्रसृत करण्यात आलेली आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Comments