स्वातंत्र्यसैनिक श्री.एकनाथ दयाराम कोठावदे
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
रविवार दि. ९ नोव्हेंबर, २०१४ रोजी पुणे येथे "त्रिदल" या संस्थेतर्फे लाड सका(शाखीय) वाणी समाजातील ज्येष्ठ "स्वातंत्र्यसैनिक" श्री. एकनाथ दयाराम कोठावदे(लाड सका/शाखीय वाणी समाजाच्या इतिहासाचे लेखक प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी यांचे मामा) यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने,स्वातंत्र्यपूर्व काळातील लाड सका/शाखीय वाणी समाजाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग समजावून घेणे उचित ठरेल.
कळवणचा "जंगल सत्याग्रह" व "साराबंदी सत्याग्रह", त्याला मिळालेली तत्कालीन राष्ट्रीय व्यक्तींची(मा.सरदार वल्लभभाई पटेल व मा.लोकमान्य टिळक) साथ क्रमाने पोस्ट करीत आहे.
सर्व लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांना विशेषतः "अलई" कुलातील समाज बांधवांना नम्र आवाहन आहे की त्यांनी या बाबतचा इतिहास विस्तृत स्वरुपात या अभ्यास गटात मांडावा.




Comments