"संगीतोपचार(Music Therapy)"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"संगीतोपचार(Music Therapy)"
©दिलीप वाणी,पुणे
या पूर्वी मी "संगीतोपचार(Music Therapy)" बद्दल काही लेख प्रसृत केले होते.आता मनजीत सारखा "दर्दी" गटावर आल्याने माझा उत्साह वाढला आहे.त्यामुळे आज राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ सांगतो.
१.राग दुर्गा - आत्मविश्वास वाढविणारा
२. राग यमन - कार्यशक्ती वाढवणारा
३. राग देस - उत्थान व संतुलन साधणारा
४. राग बिलावल - अध्यात्मिक उन्नती व संतुलन
५.राग हंसध्वनी - सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग
६.राग शाम कल्याण - मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा
७. राग हमीर - आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा
८. राग केदार - स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा
९. राग भूप - शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा
१०. राग अहिरभैरव - शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा
११. राग भैरवी - इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग
१२. राग मालकंस - अतिशय शांत मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा
१३. राग भैरव - शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.
१४. राग जयजयवंती - सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो
१५. राग भिम पलासी - संसार सुख व प्रेम देणारा
१६. राग सारंग - कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग
१७. राग गौरी - शुध्द इच्छा मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करणारा
मनजीतचे काय मत ? कोणते Neurotransmitters काम करतात ?




Comments