top of page

सका लोकांची कुंची

  • dileepbw
  • Sep 7, 2022
  • 3 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे हे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज मध्य आशियात वास्तव्याला असताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लोकरीपासून बनवलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी निमुळती कान झाकणारी कानटोपी घालत असत.त्यामुळे ग्रीक इतिहासकार "हिरोडोटस" याने त्यांना Saka tigrakhauda किंवा Orthocorybantians(People with pointed hats) असे नाव दिले होते.आज ही लाड सका(शाखीय) वाणी समाजात लहान मुलांना परिधान केल्या जाणार्‍या "कुंची" या प्रावरणामध्ये याचे अस्तित्व जाणवते.काही हिंदू देवालयांमध्ये(विशेषत: विजयानगरचे हिंदू साम्राज्य) तसेच काही हिंदू विवाह सोहळ्यात(उदा.बंगाली विवाह सोहळ्यात वधू- वरांनी परिधान करायचा तांदूळाच्या पिठापासून तयार केला जाणारा पांढरा शुभ्र व नाजूक असा "टोपोर") तसेच भाताच्या पेंढ्यापासून तयार केल्या जाणार्‍या कष्टकरी शेतकर्‍याने घालायच्या टोपीत या "सका/शक/Scythian" कानटोपीचे प्रारूप अजूनही टिकून असल्याचे जाणवते.

"सका/शक/Scythian" संस्कृती काळाच्या ओघात संपूर्ण आशिया व युरोप खंडात पसरली व ही "सका/शक/Scythian" कानटोपी अनेक देशात पोहोचली.त्या टोप्यांची व त्या देशांची नावे खालील प्रमाणे :-

१.Diba - New Guinea

२.Pilos - Ancient Greece

३.Hennin - Burgunda

४.Top - Vijayanagar,India

५.Mukut - Hindu temple hats

६.Pilos(woolen conical hat) - Cabeiri & Odysseus

७.Ancient conical hats -

८.Helmet - Hallstatt culture

९.kazaori eboshi - Japanese Heian period

१०.Judenhut - Jews

११.Papal tiara - Middle Ages

१२.Spitzhut - Bavaria

१३.Capirote - Spain

१४.capuchons - Louisiana

१५.Bashlyk - Turky

१६.sedge/rice/paddy/coolie hat -East, South and Southeast Asia,particularly Vietnam, China, Japan, Korea, Cambodia, Philippines, India, Bangladesh and Indonesia

१७.Dunce cap - given to schoolchildren to wear as punishment by public humiliation for misbehaviour

१८.Fulani hat - A conical plant fiber hat covered in leather both at the brim and top, worn by men of the Fulani people in West Africa.

१९.Golden hat Speyer - Bronze Age Europe

२०.gwanmo - This Korean traditional headgear for young boys aged one year to five years has flaps

२१. Kalpak Wassilij/Wassiljewitsch/Wereschtschagin - This high-crowned cap is usually made of felt or sheepskin. It is worn by men from southeastern Europe, Iran, Central Asia and the Caucasus

२२.Kasa Gifujyou - Japan

२३.Madhalla/Shibam -

- Yemen

२४.Mokorotlo - A straw hat used traditionally by the Sotho people

२५.Nightcap - This garment is worn while sleeping,often with a nightgown, for warmth.

२६.Party hat - playful conical hat made with a rolled up piece of thin cardboard, usually with designs printed on the outside and a long string of elastic going from one side of the cone's bottom to another to secure the cone to one's head

२६.Phrygian cap -A soft cap with the top pulled forward

२७.Pileus - a brimless, felt cap, somewhat similar to a fez used in ancient Greece and Rome,

२८.Salakot - Usually made from rattan or reeds, this is a traditional hat from the Philippines

२९.Sugar loaf - This very tall, tapering hat was first worn in medieval times. Its name comes from the loaves into which sugar was formed at that time.The sugar loaf hat is a kind of early top hat ending in a slightly rounded conical top.

३०.Tantour - this woman's headdress was popular in the Eastern Mediterranean during the 19th century.The most ornate tantours were made of gold and reached as high as 30 inches.Some were encrusted with gems and pearls.The tantour was held in by a ribbons tied around the head.A silk scarf was wound around the base with a white veil attached to the peak.

३१.Topor - A topor is worn during Bengali Hindu wedding ceremonies. It is usually white, fragile, and made of sholapith

३२.Asian conical hat -

cone-shaped hat worn in various parts of Asia

प्रत्येकाने आपली लहानपणी घातलेली कानटोपी(कुंची) आठवावी व त्याचे हे ऐतिहासक महत्व समजावून घ्यावे.ही नम्र विनंती.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल.त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page