सखी संमेलन
- dileepbw
- Sep 9, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी महिला सौ. प्राजक्ता वाणी (9870155839) यांनी १३ जानेवारी,२०१७ रोजी "पाचोरा" येथे संपन्न झालेल्या "सखी संमेलन" या लाड सका(शाखीय) वाणी महिलांच्या परिषदेचा प्रसृत केलेला गोषवारा:-
३ जुलै,२०१६ रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या सखी स्नेह संमेलनातील ३००० महिलांच्या उपस्थितीचा उच्चांक आणि दर्जेदार कार्यक्रम,कोणीही सखी पदाधिकारी नाही, कोणीही राजकीय व्यक्ती नाही,की कुठलही व्यक्तिगत मोठेपण नाही !
या पार्श्वभूमीवर, सखी स्वत्वाची जाणीव करून देणारा,स्वतः मधील उणीव दूर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेला एक "online" मंच, एक मुक्त व्यासपीठ, सर्वच सखी उच्चशिक्षित, उच्चसंस्कारीत,१३ जानेवारीला पुन्हा एकत्रित कश्यासाठी ?
नाचगाणी करण्यासाठी ? छे ! छे! अहो सामाजिक संघटन गावोगावी मजबूत करण्यासाठी !
"पाचोरा" येथील लाड सका(शाखीय) वाणी सखी "सौ.संगिता येवले" हिने हाक दिली तशा १५०० महिला एकत्रित आल्या.
"साऊंड सिस्टिम" बेताचीच असली तरी पण सुरवातच झाली ती मोठ्या दिमाखाने ! लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "शेती" या क्षेत्रात प्रभावी कामगिरी केलेल्या आदरणीय सखींच्या सन्मानाने !
"कृषिकन्या" सौ.कविता वाणी यांनी किती छान सल्ला दिला की लाड सका(शाखीय) वाणी समाजातील मुलींनी शेतकऱ्यांशी लग्न करा !
उपस्थित १५०० सखींनी तत्काळ होकार दिला ! त्यातून निदान काही जणी तरी तो अमलात आणतील किंवा त्या दृष्टीने पावलं उचलतील हाच सखी संमेलनाचा उद्देश !
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिला डॉक्टरेट सौ.उषा बागडे यांनी विषद केलेले "एकत्र कुटूंब पद्धती" चे महत्वही मोठे मोलाचे ! "एकत्र कुटूंब पद्धती" हेच त्यांच्या डॉक्टरेटचे रहस्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील कवयित्री सौ.मनीषा वाणी नोकरी,घर,संसार सांभाळून आपला काव्य संग्रह कसा प्रकाशित केला याची स्फूर्तीदायक हकीकत सांगितली.सर्व सखी त्यांचा आदर्श घेऊन आपल्यातील "छंद व कलागुण जोपासतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सत्कारांच्या कार्यक्रमानंतर "नाट्य सादरीकरण" सुरू झाले. प्रत्येक सखी वेगवेगळ्या वयोगटातील ! त्यातून सादर झाले स्त्री-पुरूष समानतेच्या बदलाचे वारे !
"असो पाखरू मासोळी,जीव जिवार मुंगळी,प्रत्येकांची ठेव ठेव काही आगळी वेगळी" ह्याची जाणीव प्रत्येक नाट्यानुभव बघताना झाली.
"स्व" म्हणजे अहंकार नाही ! तर परिस्थितीनुरूप आपल वेगळ्या "व्यक्तिमत्वा" ची जडणघडण ! त्यातून निर्माण होणारी "स्त्री शक्ती" व त्यातून घडणारे "समाज परिवर्तन" !
"भोगी" ह्या सणाच्या दिवशी झालेला हा कार्यक्रम सर्वच सखींना लाड सका(शाखीय) वाणी समाजाला "थॅलेसेमियामुक्त" करण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.ह्यात तिळमात्र शंका नाही !
चांगल्या विचारांचे बीज रोवले गेले आहे. त्याचा "वटवृक्ष" होण्यास वेळ लागणार नाही."सखी परिवारा" ची एक साखळी वाढविण्याच्या "पाचोरा" येथील यशस्वी प्रयत्नानंतर ही साखळी वाढविण्याचा प्रयत्न "सखी परिवार" करत राहणार आहे.
त्यांच्या या प्रयत्नात परमेश्वर त्यांना यश देवो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८७३७)




Comments