सखी संमेलन,नाशिक
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील शतकवीर रक्तदाते व ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.दिलीपजी कोठावदे यांनी नाशिक येथे संपन्न झालेल्या लाड सका (शाखीय) वाणी समाजातील महिलांच्या "सखी संमेलना बद्दल व्यक्त केलेल्या उस्फूर्त प्रतिक्रिया :-
"आस्था,प्रेम,आदर,एकसंघता आणि कर्तव्यतत्परता या पाच प्रेरक शक्ती जेव्हा
एकत्र येतात तेव्हाच इतिहास घडत असतो. आणि हा इतिहास आज घडला आहे ! तो घडविला आहे सखींनी ! न भूतो न भविष्यति असा इतिहास घडला आहे.रत्नजडित सुवर्णाक्षरांनी त्याची नोंद झाली आहे !
काल-परवा पर्यंत स्वयंपाक घरात रांधा-वाढा-उष्टी काढा असं आयुष्य जगणारी मने काहीतरी जगावेगळं करण्यासाठी एकत्र येतात,एक विचार,एक संकल्प घेऊन
प्रयत्नरत होतात आणि त्यातून जे घडतं ते केवळ अविस्मरणीय होऊन जात ! इतिहासरूप होऊन जात ! याचा प्रत्यय समस्त लाडशाखीयांनी घेतला.म्हणूनच हा इतिहास घडविणाऱ्या सर्व "सखी" कौतुकाच्या हक्कदार आहेत.
असं म्हटलं जात की, "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" मात्र या ठिकाणी सगळ्या यशस्वी स्त्रीयांच्या मागे एक पुरुष होता....विजय अमृतकर नावाचा !
एका ऊर्जास्रोताच्या रुपाने या ऊर्जेने सखींच्या प्रेरणेला शक्ती दिली.ही शक्ती संघटित झाली आणि तिचे भव्य-दिव्य रूप आज सगळ्या समाजाने पहिले.
या शक्तीने समाजमनात सकारात्मक विचारांची ज्योत पेटवली.या ज्योतिच्या
प्रकाशवलयाने अवघे समाजमन एका नव विचाराने उजळून निघेल यात काही शंका नाही.म्हणूनच सर्व सखींचे पुन्हा पुन्हा अभिनंदन ! "
- दिलीप कोठावदे
स्त्री शक्तीचे जे स्फुल्लिंग आज पेटलेले आहे त्याचे चिरकालीन टिकणार्या, सर्वांना उपयोगी ठरेल व सर्वांचा सहभाग असेल अशा विधायक स्वरूपाच्या सामाजिक कार्यात रूपांतर व्हावे हीच प्रभुचरणी प्रार्थना !
स्वयंस्फूर्त रक्तदानाचे महत्व जाणणार्या श्री.दिलीपजी कोठावदे यांनी आज जागृत झालेली(सोबत काही क्षणचित्रे) लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिला शक्ती "थॅलेसेमिया" या जन्मजात व अनुवांशिक पण सहजपणे टाळता येणार्या रक्त विकाराच्या प्रतिबंधाकडे वळवावी ही नम्र विनंती !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ५९६६)




Comments