"सप्त सिन्धु" अर्थात "सात सागरांचा देश" !
- dileepbw
- Sep 12, 2022
- 2 min read
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
"युनियनपेडिया" या संकेतस्थळावर या सर्व स्थलांतरीत लोकांची खालील माहिती वाचायला मिळते :-
"सका/शक/Scythian" लोकांसारख्याच मध्य आशियातील अनेक जमाती खालील मार्गांनी भारतात आल्या :-
१.खैबरखिंडीतून हिन्दुकुश पर्वत ओलांडून पंजाब प्रांतात आलेल्या जमाती :-
(पंज म्हणजे पाच व आब म्हणजे पाणी,म्हणजे फारसी भाषेत
"पांच नदियोंका(झेलम,चेनाब,राबी, व्यास व सतलज) क्षेत्र" ! म्हणजे वेदात वर्णन केलेला "सप्त सिन्धु" अर्थात "सात सागरांचा देश" !
:- सका/शक/Scythian,युएझी/युएज़ी/रुझ़ी/Yue-Tche,हूण (चीनी),पल्लव/पहलवी/पहलवान/पार्थव/पर्णी (Parthian,इराण व इराक),बाख्त्री/वाह्लीक (बॅक्ट्रियन),कांबोज,तुखारी/(Tocharian), पारद(पारशी), यवन(ग्रीक),पठाण(अफगाणिस्तान),मुगल (अरबस्तान), सोगदा/सोगदिया/सोगदियाना (उज़्बेकिस्तान), किरगिज,कझाक,उदाहरणार्थ - महमूद गजनी,चंगेज खाँ,तैमूर, बाबर,सिकन्दर इ.
२.मध्य आशियातील कश्गार या प्रांतातून तिबेट मार्गे भारतात आलेले लोक:- खस(नेपाळी क्षत्रिय)
(संदर्भ - वेस्ता सरखोष कर्टिस,सारा स्टीवर्ट,आयबी टौरिस,२००७ आयएसबीएन ९७८-१-८४५११-४०६-०४०)
मनुस्मृति,रामायण,महाभारत इ.भारतीय ग्रंथात सका/शक/Scythian लोकांबरोबरच या अन्य लोकांचा उल्लेख "परकीय आक्रमक(म्लेंच्छ)" म्हणून केलेला आढळतो.
या विविध जमातींची माहिती आपण या अभ्यासगटात क्रमाक्रमाने पहाणार आहोत.
भारतीय इतिहासात वर्णन केलेले "तुखारी" लोक म्हणजे युरोपियन लोकांप्रमाणे सोनेरी केसांचे व निळ्या डोळ्यांचे Tocharian वंशाचे लोक ! सका/शक/Scythian लोकांबरोबरच ते किजील पर्वतराजींमध्ये वास्तव्याला होते.चीनमधील शियोंगनु या प्रांतातील या तुखारी/Tocharian लोकांचा तराई प्रांतातील युएझी जमातीच्या लोकांशी कायम संघर्ष चालत असे. इ.स.८०० साली या तराई प्रांतात उइगुर लोकांचे आगमन झाले व तेथे तुर्की भाषा भाषेचे प्राबल्य वाढले.
(संदर्भ - अथर्ववेद -श्री.वासुदेव शरण आगरवाल,पृथ्वी प्रकाशन,१९६३)
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments