१६ कुलदेवता
- dileepbw
- Oct 5, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांची नावे व त्यांची भौगोलिक स्थाने यांची यादी काळजीपूर्वक पहा.
अनुवंशशास्त्र व समाजशास्त्र यांचा साकल्याने विचार केल्यास हे विशिष्ट रंगसूत्रांचे(Chromosomes) व त्यावरील जनुकांचे(Genes) "सोळा" गट आहेत.
भारतीय जाती व्यवस्था व विवाह संस्था लक्षात घेता लाड सका(शाखीय) वाणी समाजातील या "सोळा" गटात तीच तीच रंगसूत्रे(Chromosomes) व त्यावरील तीच तीच जनुके(Genes) एकवटली गेली आहेत.
आंतरजातीय विवाहांना लाड सका(शाखीय) वाणी समाजात सामाजिक मान्यता नसल्यामुळे त्याच त्याच रंगसूत्रांची (Chromosomes) व त्यावरील त्याच त्याच जनुकांची(Genes) पुनरावृत्ती पुढील पिढ्यांमध्ये होणे स्वाभाविक आहे.
याच कारणामुळे "थॅलेसेमिया" या अनुवांशिक व जन्मजात रक्त विकाराच्या "वाहकांचे(Carriers)" प्रमाण अन्य समाजांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.त्याचे परीक्षण होण्याची आवश्यकता आहे.
दरवर्षी विशिष्ट दिवशी साजरा केला जाणारा "कुलस्वामिनी महोत्सव" या रक्त तपासणीच्या महत्वाच्या कार्यासाठी सत्कारणी लावल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाजात "थॅलेसेमिया" ग्रस्त अपत्यांचा जन्म सहज टाळता येईल.
१) श्री जोगेश्वरी देवी माता 👉मुंडी मांडळ
२) श्री म्हाळसा देवी माता 👉बेटावद
३) श्री मनुदेवी माता 👉 आडगांव
४) श्री एकवीरा देवी माता 👉 वणी
५) श्री जोगेश्वरी देवी माता 👉 जोगशेलू
६) श्री धनाई पुनाई देवी माता 👉जिरनेपाडा
७) श्री एकवीरा देवी माता 👉धुळे
८) श्री जोगेश्वरी देवी माता 👉बेटावद
९) श्री मठांबा देवी माता 👉 बेटावद
१०) श्री सुलाई देवी माता 👉उटांवद
११) श्री अन्नापूर्णा देवी माता 👉कापडणे
१२) श्री सारजा बारजा देवी माता 👉 बाहळ
१३) श्री खंबाबा देवी माता 👉 हिगंणी
१४) श्री पेडकाई देवी माता 👉चिमठाणे
१५) श्री आशापूरी देवी माता 👉 पाटण
१६) श्री भवानी देवी माता 👉वेळदा
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९२७७, गट २ - ३६६६)




Comments